आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या इतिहासातील बलात्काराची सर्वात कुप्रसिद्ध घटना, कोपर्डी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असे होते कोपर्डी प्रकरण, असा मिळाला न्याय

औरंगाबाद- काही दिवसांपूर्वी तेलंगाणातील पशुवैद्यकीय डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उठली. सर्वांनी आरोपींच्या फाशीची मागणी केली होती. त्यानंतर आज पाहटे आरोपींना तपास करण्यासाठी घटनास्थळावर नेण्यात आले होते, यावेळी आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा एनकाउंटरमध्ये खात्मा करण्यात आला. अशाच प्रकारची घटना काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही घडली होती. कोपर्डीममध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी बलात्कार आणि हत्यानंतर संपूर्ण देशात प्रकरण देशात गाजले होते. जाणून घ्या कोपर्डीचा संपूर्ण घटनाक्रम...महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढणार्‍या कोपर्डीतील त्या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे (25), सहआरोपी संतोष गोरख भवाळ (30) व नितीन गोपीनाथ भैलुमे (25) यांना कोर्टाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी विविध कलमांनुसार तपशीलवार निकालाचे वाचन करून अवघ्या पाच मिनिटांत निकाल दिला. बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा होण्याचा हा सर्वात वेगवान निकाल असल्याचे या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.


घटनेच्या सव्वा वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला. खटल्यात पीडितेची आई, बहीण व मैत्रिणीच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. शिक्षेनंतर आरोपींना बंदोबस्तात पुन्हा सबजेल कारागृहात नेले. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 18 नोव्हेंबरला कोर्टाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते.


1. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे
> विनयभंग 3 वर्षे सक्तमजुरी, बलात्कार व कटात सहभाग - जन्मठेप, 20 हजारांचा दंड. खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा


2. संतोष भवाळ
> गुन्ह्यास प्रोत्साहन, विनयभंग- 3 वर्षे सक्तमजुरी, बलात्कारास प्रोत्साहन- जन्मठेप, 20 हजार दंड. न भरल्यास 3 वर्ष कैद.कट सहभाग, खून, गुन्ह्यास प्रोत्साहन फाशीची शिक्षा


3. नितीन भैलुमे
> कट रचला, बलात्कारास प्रोत्साहन -जन्मठेप, 20 हजार दंड. दंड न भरल्यास 3 वर्षे साधी कैद. कटात सहभाग, खुनास प्रोत्साहन फाशीची शिक्षा
छकुली... तुझी आठवण येते गं... अश्रूंच्या आवेगात पीडितेची आई म्हणाली, ‘छकुली... तुझी आठवण येते गं... नराधमांना फासावर लटकेपर्यंत लढाई सुरू ठेवू. यापुढे अशा घटना घडू नयेत, म्हणून कार्यरत राहीन. तसेच समाजातील इतर पीडितांवरील अत्याचाराविरुद्ध लढेन. न्यायव्यवस्था व अॅड. निकम यांच्यावर विश्वास होता. फाशीसाठी मराठा समाज एकवटला. त्यामुळेच छकुलीला न्याय मिळाला.
परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी तयार केली. कट करणारा गुन्हा करणाऱ्याप्रमाणे दोषी असतो, असा युक्तिवाद केला. सहआरोपींना फाशीच का द्यावी, यादाखल सुप्रीम कोर्टाचे 10 न्यायनिवाडे सादर केले. त्यात इंदिरा गांधी हत्या, संसद हल्ला प्रकरणाचाही समावेश होता. - अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील


पुढील स्‍लाइडवा वाचा, कोपर्डीतील 'त्या' घृणास्पद प्रकाराचा घटनेचा संपूर्ण घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...