• Home
  • Gossip
  • Flashback : Sharing Shweta Bachchan's wedding photo, Abu Jani Sandeep Khosla wrote, 'Thank you Jaya Bachchan'

Bollywood / फ्लॅशबॅक : श्वेता बच्चनच्या लग्नाचे फोटो शेअर करून, अबू जानी-संदीप खोसला यांनी लिहिले, 'धन्यवाद जया बच्चन'

श्वेताच्या मामासारखे आहेत अबू-संदीप

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 05:41:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिजायनर अबू जानी आणि संदीप खोसलाने रविवारी आपली 33 वी वर्क अॅनिवर्सरी साजरी केली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेताच्या लग्नाचे फोटोज शेअर केले. जे 1997 मध्ये निखिल नंदासोबत झाले होते. डिजायनर जोडीने सांगितल्याप्रमाणे हे पहिले लग्न होते, ज्यांच्यासाठी त्यांनी ड्रेसेस तयार केले होते. त्यांनी एका फोटोसोबत लिहिले आहेत, नवरी असूनही 1997 मध्ये श्वेता बच्चनने चिकनकारी केलेला पांढरा जोड घातला होता. हा त्या गोष्टीचा पुरावा आहे की, पांढरा रंग खरच शुभ आहे.

फोटोजसाठी जया यांना धन्यवाद म्हणाले...
आणखी एका पोस्टमध्ये अबू जानी आणि संदीप खोसलाने संगीत सेरेमनीचे फोटोज उपलब्ध करून देण्याबद्दल जया बच्चनक यांचे आभार मानले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फंक्शनसाठी बच्चन कुटुंबाचे आउटफिट तयार केले होते.

ते लिहितात कि, अमिताभ आणि जया यांनी एवढ्या मोठ्या समारंभासाठी त्यांची निवड करणे सन्मानाची गोष्ट होती. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या मनानुसार काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते, ज्यामुळे ते आपल्या मनाचे ऐकू शकतील आणि आपल्या कल्पनांना सत्यात साकारू शकतील. श्वेताने संगीत सेरेमनीसाठी गोल्डन घागरा आणि जरदोजी वसली परिधान केली होती.

श्वेताच्या मामासारखे आहेत अबू-संदीप...
अबू जानी आणि संदीप खोसलाने एका पोस्टमध्ये सांगितले आहे की, जया त्यांच्या बहिणीप्रमाणे आहेत आणि ते श्वेताच्या मामाप्रमाणे आहेत. ते अभिषेक आणि श्वेताला तेव्हापासून ओळखतात जेव्हा ते खूप छोटे होते. याकारणाने श्वेताच्या लग्नात ड्रेस तयार करणे त्यांच्यासाठी कामापेक्षाही जास्त महत्वाचे होते आणि ते त्यांच्यासाठी नेहमीच खूप विशेष असेल.

श्वेताच्या पतीबद्दल अबू आणि संदीप यांनी लिहिले की, निखिल नंदा आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या खूप जवळचे आहेत. त्यांनी नंदा कुटुंबियांसाठीही यापूर्वी प्रोजेक्टच्या स्वरूपात घराचे रीडेकोरेशन केले होते. यामुळे त्यांच्यासाठी निखिल आणि श्वेताचे लग्न खूप महत्वाचे आहे. त्यांनी लिहिले की, हा पहिला इव्हेन्ट होता, ज्यासाठी त्यांनी एंड टू एंड डिजायनिंगचे काम पहिले होते.

X
COMMENT