आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Flashback: When US Shooted Down Iran Passenger Flight Killing 290 On Board In 1988

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा अमेरिकेने चुकून पाडले होते इराणचे प्रवासी विमान! 66 चिमुकल्यांसह 290 जणांचा गेला होता जीव

एका वर्षापूर्वीलेखक: मो. इकबाल
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनल्ड रीगन - Divya Marathi
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनल्ड रीगन
  • 1988 मध्ये रोनल्ड रीगन यांची सत्ता असताना पाडले होते इराणचे प्रवासी विमान
  • त्यावेळी अमेरिकेने सुद्धा ती घटना एक मानवी चूक होती अशी कबुली दिली होती

इंटरनॅशनल डेस्क - इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान पाडल्यानंतर हसन रोहाणी सरकारवर जगभरातून टीका होत आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी चुकून हे विमान पाडल्याची कबुली दिली. या घटनेत 176 जणांचा जागीच मृत्यू झाला. इराण सरकारने या घटनेला मानवी चूक म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 31 वर्षांपूर्वी अमेरिकेने सुद्धा कथितरित्या चुकून इराणचे एक प्रवाशी विमान हाणून पाडले होते. त्यावेळी सुद्धा अमेरिकेने या घटनेला एक मानवी चूक म्हटले होते. एवढेच नव्हे, तर इराणचे विमान पाडल्याच्या अमेरिकन नौदलाच्या निर्णयाचे समर्थन सुद्धा केले होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहाणी यांनी नुकतीच या घटनेची आठवण करून दिली होती.


1988 मध्ये इराण आणि अमेरिकेत असाच तणाव सुरू होता. त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर रोनल्ड रीगन होते. तो काळ इराण आणि इराकच्या युद्धाचा होता. 3 जुलै 1988 रोजी इराणचे विमान एअरबस ए-300 तेहरान येथून दुबईच्या दिशेने उडाले. हे विमान परशियन आखातीमध्ये इराणच्या हवाई क्षेत्रात उडत असतानाच अचानक एसएम 2-एमआर मिसाइल विमानावर धडकले आणि विमानाच्या चिंधड्या उडाल्या. विमानात 290 प्रवासी होते. त्यामध्ये 66 मुलांचा देखील समावेश होता. त्यातील सर्वांचाच मृत्यू झाला. हा हल्ला अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी यूएसएस व्हिंसेन्स या युद्धनौकेवरून जमीनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाइलने केला होता.

अमेरिकेने कबुली दिली, पण कारवाईचे समर्थनच केले...
 
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनल्ड रीगन यांनी तो हल्ला आपल्याच देशाच्या सैनिकांनी केल्याची कबुली दिली. परंतु, कारवाईचे समर्थनच केले. उलट, इराणला एवढ्या खालून आणि तणावाच्या क्षेत्रावरून प्रवासी विमान उडवण्याची परवानगी देण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी केला होता. अमेरिकन लष्कराकडून आलेल्या स्पष्टीकरणानुसार, अमेरिकेच्या नौदल विभागाला ते विमान एक लढाऊ विमान वाटले होते. अमेरिकेच्या नियंत्रण कक्षातून त्या विमानाला अनेक इशारे देण्यात आले. कुठल्याही मेसेजला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर क्षेपणास्त्र सोडून ते विमान नष्ट करण्यात आले. विमान नष्ट केल्यानंतरच ते विमान एक प्रवासी विमान होते अशी माहिती समोर आली असा दावा अमेरिकेने केला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेल्यानंतर अमेरिकेने आपली चूक मान्य केली. तसेच इराणची जाहीर माफी मागताना पीडितांच्या वारसांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.