आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत देह व्यापाराचा भांडाफोड; पोलिसांकडून परदेशी तरुणीसह दोघींची सुटका, दलालास अटक

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी रात्रीच्या सुमारास केली कारवाई
  • मागील आठ दिवसांतील कारवाईत 15 तरुणींची केली सुटका

मुंबई - मुंबई पोलिसांनी अंधेरी उपनगरीतून परदेशी तरुणीसह दोघींची दलालपासून सुटका केली. या तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात येत होते. याप्रकरणी अंधेरीच्या एका हॉटेलमधून एका दलालास अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मार्लो मेट्रो स्टेशनजवळील हॉटेलमध्ये शनिवारी रात्री छापा मारला. यात 20 ते 21 वर्षे वयोगटातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. यापैकी एक तरुणी परदेशी तर दुसरी मुंबईतील आहे. पोलिसांनी याप्रकरणी  नेहरूनगर येथील रहिवासी सोनी ऊर्फ अलियास प्रभा प्रबीर मंडी या दलालास अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठ दिवसांतील कारवाईत 15 तरुणींची केली सुटका

पोलिसांनी मागील आठ दिवसांत मानवी तस्करीच्या आरोपाखाली 6 जणांना अटक केली आहे.  चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमात काम देण्याचे आश्वासनाने फूस लावलेल्या 15 तरुणींची मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमधून सुटका केल्याचे मुंबई पोलिस आयुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.