आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइटमध्ये तरूण मुलीसोबत चढला एक वयोवृद्ध, दोघांना पाहताच अटेंडेंटला आला संशय; तिने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिएटल - अलास्का एअरलाइन्सच्या विमानात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आजही चर्चा होते.  फ्लाइटमधील अटेंडेंटने प्रवास करणाऱ्या एका मुलीला तस्करीची शिकार होण्यापासून बचाव केला होता. ती मुलगी एका वयोवृद्धासोबत प्रवास करत होती आणि तिने स्वच्छ कपडे देखील परिधान केले नव्हते. मुलीची शांतता आणि घाबरलेली अवस्था पाहून अटेंडेंटला संशय आला. यानंतर तिला बाथरूममध्ये तीन शब्द लिहीलेला एक कागद मिळाला. या शब्दांवरून सगळा प्रकार अटेंडेंटच्या लक्षात आला. यानंतर तिने 'क्रू'च्या मदतीने मुलीची सुटका केली.  


यामुळे आला तिला संशय
> फ्लाइट अटेंडेंट शैलैने सदर घटना शेअर करत सांगितले की, ती 2017 साली सिअॅटल ते सॅनफ्रॅन्सिस्को दरम्यानच्या फ्लाइटमध्ये काम करत होती. तेव्हा हा प्रकार घडला होता.   

> शैलाच्या मते, त्यांच्या फ्लाइटमध्ये एक वयोवृद्ध एका तरुणीसोबत प्रवेश केला होता. त्या व्यक्तीने टापटीप कपडे परिधान केले होते. पण मुलीचे कपडे मात्र मळके होते. 

> अटेंडेंटने स्नॅक्स देताना मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण बोलणे तर दूर त्या मुलीने नजरही मिळवली नव्हती. यानंतर तिली काहीतरी मोठी गडबड असल्याचा संशय आला. 

> दरम्यान शैलाने आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली. यानंतर दोघांनी मुलीसोबत असणाऱ्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवूण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अटेंडेंट मुलीचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होती. 


बाथरूममध्ये येण्याचा केला इशारा 
> कर्मचारी त्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवूण ठेवले असता. तोपर्यंत त्या मुलीला बाथरूममध्ये येण्याचा इशारा केला. यानंतर शैलाने एक पेपरचा तुकडा आणि पेन्सिल बाथरूममध्ये ठेवले. 

> मुलीला तिचा इशारा समजला या आशेने शैला बाथरूमजवळ उभी राहिली पण मुलगी बाथरूमकडे आल्यानंतर तो वयोवृद्ध सुद्धा तिच्यासोबत होता. 

> पण यानंतरही मुलगी आपले काम करण्यात यशस्वी झाली. तिने बाथरूममध्ये ठेवलेल्या कागदावर 'आय नीड हेल्प' (मला मदत हवीय.)  असे लिहिले आणि बाहेर आली. 

 

कागदावरील मजकूर वाचताच पायलटला केले अलर्ट 

> बाथरूममध्ये ठेवलेली नोट वाचताच शैलाने पायलटला सावध केले. यानंतर पायलटने ग्राउंड कन्ट्रोलहून संपर्क साधून अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना संबंधित माहिती दिली आणि लँडिंगच्या वेळी त्या वयोवृद्धाला पकडण्यात मदत केली. 
 
> वयोवृद्धाला पकडल्यानंतर माहित झाले की, ती मुलगी मानव तस्करीची शिकार होणार होती. पण फ्लाइट अटेंडेंटच्या हुशारी आणि संवेदनशीलतेमुळे त्या मुलीला वाचवता आले. 

बातम्या आणखी आहेत...