आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून अाता अहमदाबादला अाठवड्यात ६ दिवस विमानसेवा; एअर डेक्कनकडून घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिककरांसाठी अाता अहमदाबादकरिताही विमानसेवा उपलब्ध हाेणार असून, याची अधिकृत घाेषणा एअर डेक्कन अाणि एअर अाेडिसाचे व्यवस्थापकीय संचालक शैशव शहा यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केली. येत्या दहा दिवसांत या सेवेची वेळ अाणि मार्ग जाहीर करणार असल्याचे सांगतानाच १८ अासनी विमानाद्वारे साेमवार वगळता अाठवड्यातून सहा दिवस ही सेवा नाशिककरांना मिळणार असून, प्रवासभाडे एका बाजूने ३००० ते ४५०० रुपयांदरम्यान असेल. 


एअर डेक्कनकडून २३ डिसेंबर २०१७ पासून नाशिक-मुंबई अाणि नाशिक-पुणे अशा दाेन मार्गावर उडान याेजनेंतर्गत विमानसेवा दिला जात हाेती. मात्र या सेवेबाबत अनेक तक्रारी, अडचणी हाेत्या. यानंतर एअर डेक्कन अाणि एअर अाेडिसा या दाेन कंपन्यांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या शैशव शहा यांनी ही सेवा अाता हाती घेतली असून, यापूर्वी अालेल्या अनेक तक्रारींतून मार्ग काढला अाहे. याच अनुषंगाने निमा हाऊस येथे त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतून एअर डेक्कनने विश्वासार्हता निर्माण करण्याबाबतचा सल्ला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, विश्वासार्हता सिद्ध केल्यास अाज ती नसतानाही अर्धी अासने भरली जात अाहेत, विश्वासार्हता सिद्ध केल्यास काेणाच्याही हमीची गरज भासणार नसल्याचे या संघटनांनी सांगितले. यावर शहा यांनी डेक्कनच्या व्यवस्थापनात अाणि प्रणालीत पूर्ण बदल झाल्याची माहिती दिली. १७ दिवसांपासून नाशिक-पुणे अाणि नाशिक-मुंबर्इ सुरळीत सेवा असल्याचेही सांगितले. यावेळी खासदार हेमंत गाेडसे, एअर डेक्कनचे नॅशनल हेड जिगर, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सेक्रेटरी तुषार चव्हाण, माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, मनीष काेठारी, मनीष रावल, नाशिक सिटिझन फाेरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, क्रेडार्इ नॅशनलचे जितेंद्र ठक्कर, उद्याेजक जनक सारडा, महाराष्ट्र चेंबरचे भावेश माणेक, सुनीता फाल्गुने, अायमाचे सेक्रेटरी ललित बूब, मधुकर ब्राह्मणकर अादी उपस्थित हाेते. 

 

सकाळी अहमदाबादहून नाशिक तर सायंकाळी परतीची सेवा 
नियाेजित मार्गानुसार सकाळी लवकर अहमदाबादहून नाशिकला विमान येर्इल. त्यानंतर ते मुंबर्इकरिता टेकअाॅफ करेल. सायंकाळी मुंबर्इहून नाशिकला तर नाशिकहून अहमदाबादला टेकअाॅफ हाेर्इल. अहमदाबाद अाणि नाशिकहून टेकअाॅफ अाणि लँडिंगची वेळ येत्या दहा दिवसांत जाहीर करणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...