Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Flight from Shirdi for Delhi, Bangalore

दिल्ली, बंगळुरूसाठी शिर्डीतून विमानसेवा; २० सप्टेंबर अाणि एक अाॅक्टाेबरचा 'मुहूर्त'

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 06:18 AM IST

२० सप्टेंबरपासून शिर्डीहून दिल्लीसाठी व एक १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती विमानतळाचे संच

  • Flight from Shirdi for Delhi, Bangalore

    शिर्डी- २० सप्टेंबरपासून शिर्डीहून दिल्लीसाठी व एक १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालक धीरेन भोसले यांनी दिली.


    अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत गेल्या वर्षी १ आॅक्टोबर राेजी विजयादशमीला राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे उद‌््घाटन झाले. त्यानंतर येथून हैदराबादसाठी नियमित सेवा सुरू झाली. शिर्डीहून दिल्लीसाठीही विमानसेवा सुरू व्हावी अशी साईभक्तांची मागणी हाेती. ती अाता पूर्ण हाेत अाहे.


    स्पाइसजेट एअरलाइन्सचे बोइंग ७३७-८०० हे १८९ आसनी विमान २० सप्टेंबरपासून सुरू हाेईल. दिल्लीतून दुपारी १२.४५ वाजता निघुन हे विमान २.३० वाजता शिर्डीत पोहोचेल. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर दुपारी तीन वाजता ते दिल्लीसाठी उड्डाण करील. तसेच स्पाइसजेटचे क्यू-४०० हे ७८ आसनी विमान एक अाॅक्टाेबरपासून सुरू हाेईल. बंगळुरूहून सकाळी ते शिर्डीला येईल. त्यानंतर मुंबईला जाईल. मुंबईहून परत येऊन बंगळुरूला जाईल, असे भोसले यांनी सांगितले.

Trending