आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Flights From Shirdi To Bangalore, Bhopal, Jaipur, Ahmedabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगळुरू, भोपाळ, जयपूर, अहमदाबाद शहरांसाठीही शिर्डीतून विमानसेवा; देशभरातील भाविकांची हाेणार साेय,

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - वर्षभरापूर्वी शिर्डीतून मुंबई, दिल्ली व हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली, त्याचा सुमारे दीड लाख भाविकांनी लाभ घेतला. आता नवीन वर्षात रविवारपासून बंगळुरू, भोपाळ, जयपूर, आणि हैदराबाद या ४ ठिकाणांसाठी दरराेज विमानसेवा स्पाइसजेटने सुरू केली अाहे. तर साेमवारपासून अहमदाबादसाठीही सुरू हाेईल. तसेच १० जानेवारीपासून चेन्नई ते शिर्डी ही १८९ आसनी बोइंग सेवा सुरू होणार आहे. 

 

१ ऑक्टोबर २०१७ रोज़ी शिर्डीतून विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवसापासून मुंबई - शिर्डी, हैदराबाद - शिर्डी येथून एअर इंडियाने सुरू केलेल्या विमानसेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर हैदराबाद येथून दुसरे विमान सुरू करण्यात आले. दररोज शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात स्पाइसजेटने १८९ आसनी डेली बोइंग विमानसेवा सुरू केली. दिल्लीच्या भाविकांचा दिल्ली-शिर्डी या विमानसेवेला उदंड प्रतिसाद मिळाला. दरराेज १०० टक्के प्रवासी मिळत असल्यामुळे दिल्लीहून आणखी एक बोइंग विमान सुरू करण्याचा निर्णय स्पाइसजेटने घेतला आहे. त्याचे अजून शेड्युलिंग झालेले नसले तरी आगामी काही दिवसांतच ही दुसरी फ्लाइट सुरू होणार आहे. आता ६ जानेवारीपासून जयपूर-शिर्डी, भोपाळ - शिर्डी, बंगळुरू-शिर्डी, हैदराबाद -शिर्डी ही डेली विमानसेवा स्पाइसजेटकडून क्यू ४०० बनावटीच्या ७८ आसनी विमानांद्वारे सुरू झाली आहे. दर रविवारी शिर्डी-हैदराबाद विमानसेवा सुरू होणार आहे. हैदराबाद येथून शिर्डीसाठी दररोज दोन विमाने येत आहेत. आजपासून आठवड्यातून मंगळवार व रविवार अशी आणखी दोन विमानांची भर पडणार आहे.

 

दरराेज १६ विमानांचे शेड्युलिंग 
स्पाइसजेटच्या दिल्ली ते शिर्डी १८९ आसनी बोइंग विमानसेवेला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता १० जानेवारीपासून चेन्नई ते शिर्डी आणि शिर्डी ते चेन्नई अशी राेज बोइंग विमानसेवा सुरू हाेत आहे.त्याचे शेड्युलिंगही करण्यात आले आहे. सध्या १४ विमानांचे शेड्युलिंग आहे. त्यात आणखी दोनची भर पडेल.