आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Flipkart Co Founder Sachin Bansal's Wife Priya Filed A Complaint Of Torture For Dowry Against Him

फ्लिपकार्टचे को-फाउंडर सचिन बन्सल यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, पत्नी प्रियाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे को-फाउंडर सचिन बन्सल यांच्यावर त्यांची पत्नी प्रिया (35) ने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. प्रियाने 28 फेब्रुवारीला बंगळुरू पोलिसांना 7 पानांची तक्रार दिली होती. ज्यामध्ये तिने स्वतःला आणि मुलाला सचिन बन्सलपासून धोका असल्याचे सांगितले आहे. प्रियाने दावा केला आहे की, हुंड्यासाठी सासरी त्यांना मारहाण केली गेली. याच्या आधारे सचिन, त्याचे आई वडील आणि भाऊ यांच्याविरुद्ध केस दाखल केली गेली आहे. 

एसीपी (मदिवाला) बासवन गौड़ा म्हणाले की, प्रियाच्या तक्रारीच्या आधारे 4 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केली गेली. यामध्ये सचिनव्यतिरिक्त त्यांचे वडिल सत प्रकाश अग्रवाल, आई किरण बन्सल आणि भाऊ नितिन बन्सल यांची नावे सामील आहेत. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. आतापर्यंत कुणालाही अटक झालेली नाही. 

सचिनने माझी सर्व प्रॉपर्टी ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता : प्रिया... 

तक्रारीत प्रियाने सांगितले, ''सचिनसोबत 2008 मध्ये माझे लग्न झाले होते. लग्नपूर्वी सासू सासरे आमच्या घरी आले होते आणि त्यांची जास्त हुंड्याची मागणी केली होती. सासू म्हणाल्या होत्या की, मी लग्नामध्ये कमीत कमी 15 तोळे सोन्याचा हार घालावा. नाईलाजाने माझ्या आईवडिलांनी ते केले होते. चंदीगडमध्ये झालेल्या सोहळ्यात वडिलांनी 50 लाख रुपये खर्च केले होते. यानंतर 11 लाख वेगळे सचिनला दिले. लग्नानंतर नवरा आणि सासरच्या मंडळींनी माझा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या छळ केला. एवढेच नाही, सचिनने दिल्लीमध्ये माझ्या बहिणीचे लैंगिक शोषणदेखील केले होते. पती माझ्या नावावर केली गेलेली सर्व प्रॉपर्टी आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी विरोध केला तेव्हा मागच्यावर्षी 20 ऑक्टोबरला मारहाण केली. मला आणि मुलगा आर्यमानला सचिन आणि त्याच्या आई वडिलांपासून धोका आहे.''

बातम्या आणखी आहेत...