Home | Business | Gadget | flipkart is first choice of online smartphone buyers in india

ऑनलाइन स्मार्टफोनच्या खरेदीसाठी फ्लिपकार्ट पहिली पसंत, चीनी कंपन्यांच्या फोनला आहे जास्ती मागणी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 24, 2018, 12:04 AM IST

स्मार्टफोनच्या विक्रीत माउथ पब्लिसिटी महत्त्वाची भुमीका पार पाडते.

 • flipkart is first choice of online smartphone buyers in india


  गॅजेट डेस्क- इंटरनेशनल डेटा कॉरपोरेशन (आईडीसी) ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, ऑनलाइन स्मार्टफोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट लोकांची पहिली पंसत आहे. पण, हेदेखील सांगितले की 30 हजारपेक्षा जास्ती किंमतीचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अमेझॉन पहिली पसंत आहे. पण 10-20 हजारांचे फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट लोकांची पहिली पसंत आहे. आयडीसी इंडियाने या रिसर्चमध्ये 8 शहरातील 1700 लोकांना यात सामील केले.


  आईडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, बहुतेक लोक यासाठी नवीन फोन घेतात कारण त्यात नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस मिळते. त्याशिवाय हेदेखील सांगण्यात आले की, 'माउथ पब्लिसिटी' लोकांना प्रभावीत करते. वनप्लस, श्याओमी सारखे ब्रँडच्या लोकप्रियतेत याची महत्त्वाचा भुमीका आहे.

  रॅम आणि प्रोसेसर सगळ्यात महत्त्वाचे

  आईडीसी इंडियाचे मार्केटिंग एनालिस्ट सचिन मेहताने सांगितले, "चीनी कंपन्या आपल्या फोनमध्ये कमी किमतीत चांगले स्पेसिफिकेशंस देत आहेत. आजकाल, जास्त रॅम आणि चांगले प्रोसेसर असलेल्या फोनला मागणी आहे.त्यानंतर बॅटरी कॅपेसिटी आणि चांगली कॅमरा क्वालिटीला लोक पाहतात. त्याशिवाय फेस अनलॉक फीचर आणि वॉटरप्रूफिंग सारखे स्पेसिफिकेशंसकडे लोकांचे लक्ष जाते."

  ऑफर नाहीं, कंफर्टसाठी ऑनलाइन शॉपिंग आवडते
  आईडीसी इंडियामध्ये चॅनल रिसर्चच्या एसोसिएट रिसर्च मॅनेजर उपासना जोशी यांचे म्हणने आहे की, "आजकाल ई-कॉमर्स कंपन्यांकडून मिळणारे डिस्काउंट आणि ऑफरशिवाय 40% लोक कंफर्ट आणि सुविधेमुळे ऑनलाइन शॉपिंग पसंती देत आहेत.त्याशिवाय ईएमआय ऑप्शन आणि कॅशबॅक ऑफरमुळे लोकांत ऑनलाइन शॉपिंगची क्रेज वाढतच आहे."

  या रिसर्चमधल्या तीन महत्त्वाच्या बाबी
  या रिसर्चमध्ये समोर आले की, ज्या लोकांनी आपल्या पहिल्या स्मार्टफोनसाठी 10-20 हजार रुपये खर्च केले होते, ते आता 30 हजारपेक्षा जास्त रूपये खर्च करत आहेत.

  बहुतेक लोक डिजाइन आणि क्वालिटीच्या बाबतीत श्याओमी, ओप्पो आणि वीवो सारख्या ब्रँड्सना चांगले मानतात. तर वनप्लस आतापण प्रीमियम ब्रँड आहे.

Trending