आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फ्लिपकार्टने लॉन्च केली स्वतःची व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस, अॅमेझॉन प्राइमला मिळू शकते आव्हान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क - ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपली व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस सुरु केली आहे. सध्या अँड्राईड युझर्स या सेवेचे लाभ घेऊ शकतात. या सर्व्हिसमुळे फ्लिपकार्ट भारतातील अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन सर्व्हिसला आव्हान देणार आहे. कंपनीने या सर्व्हिसबाबत मागील महिन्यात घोषणा केली होती. यानंतर आता कंपनीने युझर्ससाठी ही सर्व्हिस सुरु केली आहे. सध्या फ्लिपकार्ट व्हिडिओ सर्व्हिसवर Viu, Voot, Arre आणि TVF चे व्हिडिओ आणि सिनेमे उपलब्ध आहेत. 

> फ्लिपकार्टचे प्रकाश सिकारिया यांचे म्हणणे आहे की बाजारातील मागणी लक्षात घेता आम्ही आमची व्हिडिओ सर्व्हिस तीन मुख्य आधारांवर तयार केली आहे. यामध्ये फ्री क्युरेटेड आणि पर्सनलाइज्डचा सहभाग आहे. ग्राहकांना प्रीमियम कंटेंट पाहण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागू नये यासाठी आम्ही ग्राहकांना सध्या उपलब्ध असलेल्या सर्व्हिसेसपेक्षा काही वेगळे देण्याचा आमचा उद्देश आहे.  
 
> सदरील व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस अँड्राईड अॅप युझर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ही सुविधा वापरण्यासाठी फ्लिपकार्ट युझर्सला आपल्या अँड्राईड स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट वर्जन 6.17 डाउनलोड करणे गरजेचे आहे.  
 
> फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉन भारतात आपल्या स्ट्रीमिंग सर्व्हिस अॅमेझॉन प्राइमसाठी वर्षाला 999 रुपये घेते. जर एखादा युझरला मासिक सब्सक्रिप्शन घ्यायचे असेल तर त्याला महिन्याला 129 मोजावे लागतात. अॅमेझॉन प्राइम सब्सक्राइबरला अॅमेझॉनवरून खरेदी केलेल्या सामानाची स्पीडी डिलीव्हरी देखील मिळते. फ्लिपकार्टकडे सध्या 15 कोटी युझर्स आहेत. कंपनीला आगामी काही वर्षांत ही संख्या वाढवून 35 कोटी करायची आहे. यासाठी फ्लिपकार्ट देशातील टिअर-2 आणि टिअर-3 शहरांना लक्ष्य करत आहे.