आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : वॉलमार्टने गुंतवणूक केल्यानंतर फ्लिपकार्टने आकर्षक ऑफर्स वर्षाव सुरू केला आहे. किरकोळ क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी फ्लिपकार्टने घरगुती वस्तू 1 रुपयांमध्ये देण्याची सुरुवात केली आहे. जाणून घ्या या ऑफर बाबतीत.
ही आहे वर्तमान ऑफर
वॉल-मार्टची गुंतवणूक असलेली फ्लिपकार्ट प्रत्येक वेळी एक रुपयाचा सेल आयोजित करीत आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला घरगुती उपयोगासाठीच्या अनेक सामानांवर शानदार सूट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या वर्तमान ऑफर्समध्ये तुम्हाला पीठ, शॅम्पू, दाळ-तेल इत्यादी गोष्टी किरकोळ किमतीत खरेदी करता येतील.
येथे मिळत आहे सामान
फ्लिपकार्टच्या सुपरमार्टमध्ये तुम्ही एक किलो तूर दाळ, तांदूळ, साखर, शुद्ध तेल आणि आटा एक रुपयाच्या नाममात्र किंमतीत विकत घेऊ शकता. तर Today's Steal Deals अंतर्गत ग्राहकांना दररोज तीन गोष्टी फक्त एक रूपयांमध्ये देण्यात येत आहे.
ही आहे अट
फ्लिपकार्टच्या या डीलचा फायदा घेण्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे. एक रूपयांमध्ये या तीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 599 रूपयांची खरेदी करणे आवश्यक असल्याची फ्लिपकार्टची अट आहे.
तुम्ही जर फ्लिपकार्ट वरून कोणतेही सामानाची 599 रूपयांत खरेदी करत असालत तर त्यानंतर तुम्हाला 1 रूपयामध्ये एक किलो दाळ, 1 किलो साखर आणि 1 लीटर तेल खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अॅक्सिस बँकद्वारे कॅशबॅकची ऑफर मिळत आहे.
15 टक्के सूट देखील मिळणार
फ्लिपकार्टच्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे खरेदी केल्यास आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे त्याचे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 15 टक्के सूट मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 1,500 रूपयांची खरेदी करणे आवश्यक आहे.
करत आहे स्पर्धेची तयारी
अॅमेझॉन आणि बिग बास्केट सोबत ग्राफर्स ई-कॉमर्स मार्केटमध्ये हिस्सेदारी वाढविण्यासाठी फ्लिपकार्ट प्रचंड स्पर्धा करीत आहेत. तुम्ही जर आज फ्लिपकार्टद्वारे शॉपिंग केली तर तुम्हाला फक्त 1 रूपयामध्ये एक किलो तूर दाळ आणि 1 रूपयात एक लीटर मोहरीचे तेल खरेदी करता येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.