आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टला ‘पॅरंट’ कंपनीकडून दोन लाख काेटी रुपयांचा निधी

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्लिपकार्ट या ई-काॅमर्स कंपनीने सिंगापूर येथील पॅरंट कंपनीकडून २,८३० काेटी रुपयांचा निधी उभारला असल्याची माहिती पेपर.व्हीसी या डेटा इंटेलिजन्स कंपनीच्या अहवालात समाेर आली आहे. अहवालानुसार फ्लिपकार्टने हा निधी प्रति समभाग ३४,७९९ रुपयांच्या अधिमूल्याने उभारला आहेे.्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर  पालक कंपनीकडून २०१९ मध्ये मिळालेला हा सर्वात माेठा निधी आहे. याअगाेदर कंपनीला पॅरंट कंपनीकडून आॅगस्टमध्ये २२.५४ काेटी डाॅलर आणि जानेवारीमध्ये २० काेटी डाॅलरचा निधी मिळाला हाेता, असे पेपर.व्हीसीने एका विधानात म्हटले आहे.फ्लिपकार्ट देशातील सर्वात माेठी ई-काॅमर्स कंपनी आहे आणि अमेझाॅनबराेबर तिची कडवी स्पर्धा आहे. स्पर्धकांवरची पकड भक्कम करण्यासाठी कंपनी हर प्रकारे प्रयत्न करत आहेे आणि निधी मिळवणे हे त्यापैकी एक आहे.


कंपनीने हिंदी व्हर्जन तसेच आेटीटी  प्लॅटफाॅर्मही केला आहे ल
ाँच


माेठ्या शहरात जम बसवल्यानंतर आता कंपनी टियर २ आणि टियर ३ शहरांवर जाेर देत आहे. पुढील २० काेटी ग्राहक मिळवण्यासाठी फ्लिपकार्टने अॅपचे हिंदी व्हर्जन लाँच केले आहे. त्याचबराेबर कंपनीने आॅक्टाेबरमध्ये आेटीटी प्लॅटफाॅर्म लाँच केला आहे. या प्लॅटफाॅर्मवर आेरिजिनल कंटेंट देण्यासाठी कंपनीने अनेक प्राॅडक्शन हाऊसबराेबर करारही केला आहे. अमेरिकेच्या वाॅलमार्टने २०१८ वर्षात फ्लिपकार्ट १,६०० काेटी रुपयांत खरेदी केली हाेती. देशातील ई-काॅमर्स बाजारपेठेचा महसूल २०२० पर्यंत १२,००० काेटींवर जाणार


भारत देशातील सर्वात वेगाने वाढणारी ई-काॅमर्स बाजारपेठ म्हणून आेळखल्या जातेे. वर्ष २०२० पर्यंत भारतीय ई-काॅमर्स बाजारपेठेचा महसूल १२,००० काेटी डाॅलर (अंदाजे ८.६ लाख काेटी रु) पर्यंत  जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  २०१७ मध्ये  ही बाजारपेट  केवळ २.७ लाख काेटी रुपयांची हाेती. ई-काॅमर्स बाजारपेठेचा महसूल वार्षिक आधारावर ५१ % इतक्या वेगाने वाढत आहे. तसेच त्याचे मार्केटप्लस माॅडेलमध्ये स्वयंचलित मार्गाने १०० % एफडीआयला परवानगी दिली आहे.रिलायन्सच्या प्रवेशाने वाढणार ई-काॅमर्स बाजारात स्पर्धा

सगळ्यात श्रीमंत भारतीय व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीही ई-काॅमर्स क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर फ्लिपकार्ट व अॅमेझाॅनला माेठी स्पर्धा निर्माण हाेऊ शकते. रिलायन्स साधारणपणे नवीन क्षेत्रात आक्रमकपणे प्रवेश करणारी म्हणून आेळखली जाते. दूरसंचार क्षेत्र या गाेष्टीचा साक्षीदार आहे. रिलायन्स जिआेच्या प्रवेशाआधी बाजारात असलेल्या दूरसंचार कंपन्यांना धाेरण बदलणे भाग पडले हाेते. जिआेने कंपनीला ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे . ई-काॅमर्स क्षेत्रात भक्कम पाऊल टाकण्याचा रिलायन्सचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...