Gadget / अमेझॉनला आव्हान : फ्लिपकार्टची दिवाळीपूर्वी फ्री व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा

नवे २० कोटी युजर्स जोडण्याचे लक्ष्य, उत्पन्न जाहिरातीतून मिळणार

दिव्य मराठी

Aug 06,2019 10:36:00 AM IST

नवी दिल्ली - वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट भारतात व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा फ्लिपकार्ट व्हिडिओज लाँच करेल. युजरकडून कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क घेतले जाणार नाही आणि हा प्लॅटफॉर्म जाहिरातीतून चालेल.


फ्लिपकार्टने हा निर्णय प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉनला आव्हान देण्यासाठी घेतला आहे. अॅमेझॉन प्राइम जेफ बेजो यांची कंपनी अमेझॉन सर्व्हिस आहे. वॉलमार्ट आणि अमेझॉन दोन्ही अमेरिकी कंपन्या आहेत. फ्लिपकार्टनुसार, त्यांची स्ट्रीमिंग सेवा अनेक भारतीय भाषांत उपलब्धअसेल. कंटेंट म्हणून चित्रपट, लघुपट, वेब सिरीज आदी उपलब्ध करेल. या सेवेमुळे भारतात नवे २० कोटी युजर जोडण्यात यश मिळेल,अशी कंपनीला आशा आहे.

अॅमेझॉन प्राइमची सेवा वार्षिक ९९९ रुपयांत उपलब्ध
फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉन भारतात आपली स्ट्रिमिंग सेवा अॅमेझॉन प्राइमसाठी वार्षिक ९९९ रुपये शुल्क घेईल. एखादा युजर मासिक दराने सब्सक्रिप्शन घेऊ इच्छित असेल तर त्याला १२९ रुपये दरमहा द्यावे लागतील. अॅमेझॉन प्राइम सब्सक्रायबरला प्लॅटफॉर्मवर खरेदी केलेल्या सामानाची वेगात पुरवठा होईल. फ्लिपकार्टजवळ सध्या १५ कोटी युजर्स आहेत. कंपनी आगामी वर्षांत ३५ कोटींपर्यंत पोहोचू इच्छित आहे.

X