आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुपरमार्टमध्ये फक्त 1 रुपयात मिळताहेत किलोभर तांदूळ, डाळ अन् आटा; धमाकेदार ऑफरवर ग्राहकांच्या उड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक फ्लिपकार्टने ग्रोसरी स्टोअर म्हणजेच सुपरमार्ट लाँच केले आहे. हे सुपरमार्ट सध्या बंगळुरू आणि हैदराबादेत सुरू झाले आहे. कंपनी या मार्टवर कस्टमर्ससाठी धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनुसार कस्टमरला फक्त 1 रुपयात आटा, 1 रुपयात डाळ आणि 1 रुपयात तांदूळ मिळतील. म्हणजेच फक्त 3 रुपयांत तुम्ही हे तिन्ही आयटम 1-1 किलो खरेदी करू शकता.

 

अशी आहे सुपरमार्टची पूर्ण ऑफर
या सुपरमार्टमध्ये डेली Today's Steal Deals नावाची ऑफर असेल. ज्यात कस्टमर 1-1 रुपयात दररोज 3 आइटम खरेदी करू शकतील. हे आइटम्स खाण्याच्या वस्तू असतील. तथापि, या ऑफरचा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा कस्टमर 600 रुपयांची शॉपिंग करेल. सध्या कंपनी ऑफरमध्ये आटा, डाळ आणि तांदूळ देत आहे. ही ऑफर ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हींवर मिळेल. फक्त तुमच्या शहरात फ्लिपकार्टचा सुपरमार्ट असले पाहिजे. कंपनी लवकरच नवे सुपरमार्ट दिल्लीत सुरू करणार आहे.

 

फ्लिपकार्टची 'प्लस' सर्व्हिस
15 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्टने कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम 'फ्लिपकार्ट प्लस' लाँच केले आहे. या सर्व्हिसमध्ये कंपनी कस्टमर्सना अनेक बेनिफिट्स देईल. कंपनीची ही सर्व्हिस पूर्णपणे फ्री आहे. फ्लिपकार्टवर शॉपिंग केल्यानंतर पॉइंट्स अर्न होतील. जेव्हा 50 पॉइंट्स होतील तेव्हा तुम्हाला 'फ्लिपकार्ट प्लस' सर्व्हिस मिळेल.   

 

बातम्या आणखी आहेत...