आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkart मध्ये सुरु होणार मेगा जॉब ओपनिंग, तुमच्यासाठी सुवर्ण संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी Flipkart ने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात नवीन लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनी मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, एचआर आणि प्रोडक्ट यासारख्या विभागांमध्ये भरती करणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी अनेक कर्मचाऱ्यांची विदेशात ट्रान्स्फरही करू शकते. यामुळे भारतीय बिझनेसला वॉलमार्टप्रमाणे जगभरात पोहोचवले जाऊ शकेल. फ्लिपकार्टच्या एक प्रवक्ताने ईमेलच्या माध्यमातून सांगितले की, 'फ्लिपकार्ट भारतामध्ये इ-कॉमर्स वाढवण्यासाठी प्रतिबद्ध असून 20 कोटी ग्राहकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी जोडण्यास इच्छुक आहे. हा टप्पा गाठण्यासाठी आम्ही विकास योजना आणखी फास्ट करत आहोत. यासोबतच कुशल लोकांना आम्ही फ्लिपकार्टसोबत जोडण्यास इच्छुक आहोत.'


फ्लिपकार्टला जगातील सर्वात मोठी कंपनी बनवण्यास इच्छुक आहे वॉलमार्ट
कंपनी प्रवक्ताने सांगितले की, कुशल कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या योजना पुढे जातील. बंगळुरूमध्ये रिक्रुटमेंट कंपनी फ्लिपकार्टसाठी एक्झिक्युटिव्ह पदासाठी कमीत कमी पाच लोकांचा शोध घेत आहे. कंपनीच्या सिनिअर पार्टनरने दिलेल्या माहितीनुसार वॉलमार्टची अशी इच्छा आहे की इ-कॉमर्स क्षेत्रामध्ये फ्लिपकार्ट एवढी पुढे जावी की कोणतीही इतर कंपनी यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही.


फ्लिपकार्टच्या माध्यमातून 16 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यास इच्छुक वॉलमार्ट
भारतामध्ये कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉन आहे. यामुळे वॉलमार्ट फ्लिपकार्टमध्ये नवीन भरती करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. यामुळेच फ्लिपकार्ट मोठ्या संख्येने नवीन लोकांची भरती करणार आहे. यासाठी कंपनी नवीन लोकांना चांगला पगारही देऊ शकते. फ्लिपकार्टच्या माध्यमातून वॉलमार्ट भारतामध्ये 16 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.


पुढे वाचा, फ्लिपकार्टचे को-फाउंडर आणि ग्रुप सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा...

बातम्या आणखी आहेत...