आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टचा इयर एंड कार्निवल सेल, स्मार्ट टीव्हीसह इतर अप्लायंसवर मिळतीये भरघोस सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भारतातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने इयर एंड कार्निवल सेलचे आयोजन केले आहे. 23 डिसेंबरला 12 वाजेपासून या सेलला सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये टीव्ही आणि अप्लायंसवर 70 टक्के सूट देण्यात येणार आहे. 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर असे 9 दिवस हा सेल सुरू असणार आहे. सेलला लक्षात घेता कंपनीने एसबीआयसोबत भागीदारी केली आहे. यामुळे डेबिट कार्ड युझर्सना 10 टक्केपर्यंत सूट मिळणार आहे. 9 दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना रात्री 12 ते 2 वाजेदरम्यान आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहे. 

 
या वस्तूंवर मिळणार डिस्काउंट

सेल दरम्यान कंपनी अँड्रॉईड टीव्हीवर एक्सचेंज आणि 28 हजार रूपयांपर्यंतचा डिस्काउंट देणार आहे. तर शाओमी, सॅमसंग सारख्या मोठ्या कंपन्यांच्या टीव्ही मॉडेलवर 10 हजार पर्यंत सूट देत आहे. 

 

फ्लिपकार्टच्या मते, वॉशिंग मशीन, फ्रिज, मायक्रोवेव्ह, ओव्हनवर सूट देण्यात येत आहे. 

 

शाओमीच्या Mi 43 इंच स्मार्ट टीव्ही 22,999 ऐवजी 21,999 रूपयांना देण्यात येत आहे. 

 

सॅमसंगचा 32 इंच HD LED टीव्ही 26,900 रूपयांऐवजी 15,999 मध्ये मिळत आहे. 

 

Thomson B9 Pro 40 इंच फुल HD स्मार्ट टीव्ही 25,999 ऐवजी 17,999 रूपयांना मिळणार आहे. 

VU HD रेडी टीव्ही 16 हजारऐवजी 12,999 रूपयांना मिळत आहे. 

 

Micromax HD TV 19,990 ऐवजी 10,499 मध्ये मिळणार आहे. 

 

VUचा फुल एचडी टीव्ही 24 हजारऐवजी 10,499 रूपयांना देण्यात येणार आहे. 

 

नो कॉस्ट ईएमआयची सुविधा
सेलमध्ये ग्राहकांना 12 महिन्यांसाठी 0 टक्के नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकाला एखादे 12 हजार रूपयांचे प्रोडक्ट खरेदी करण्याची इच्छा असेल तर तो ते प्रॉडक्ट 3 महिन्याचा ईएमआय प्लॅन करून घेऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...