आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसाचा हाहाकार, पिंपळगाव रेणुकाईत ढगफुटीने घरांची पडझड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यातून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या इतर भागात पावसाने काहीसा ब्रेक घेतला असताना भोकरदन तालुक्यात मात्र शनिवारी पावसाने हाहाकार उडवला. पिंपळगाव रेणुकाई मंडळात तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यातून आज(शनिवार) सकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 145 मिमि पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली असुन तालुक्यात सरासरी 55 मिमि पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश नद्यांना पूर आला असुन काही ठिकाणी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दानापूर,पिंपळगाव रेणुकाई आणि पारध या भागात काही घरांची पडझड झाली. भोकरदन तालुक्यात मागील तीन आठवड्यापासुन सलग कमी अधीक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतातील उभी व सोंगणी करुन ठेवलेल्या पिकाची पूर्णतः वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी भर पाण्यातून मका तसेच सोयाबीन बाहेर काढले होते. यासाठी मजूरीसाठीही अतिरीक्त खर्च सोसावा लागला. एव्हढे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर बचावलेल्या पिकांचे शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसाने पाणी फिरवले.
शुक्रवारी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, धावडा या मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतात हाती लागण्यासारखे तीस टक्के पिके उरली होती. ती देखील आता पूर्णतः उद्ववस्त झाली. यंदा मोठ्या उमेदीने व जिद्दीने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, ऐन पिक घरात ऐण्याच्या काळातच निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. सध्या शेतात उभ्या असलेल्या मका व सोयाबीन पिकाला अंकुर फुटले आहे तर जमा करुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजातही पाणी शिरले असल्याने ते देखील नसल्यातच जमा आहे. विशेष म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील मकाचे पिके पाण्याच्या बाहेर काढून कणसे वाळण्यासाठी बांधावर एकत्र केले हाेते. त्याला देखील आता कोंब येत असल्याने ती देखील मेहनत शेतकऱ्यांची वाया गेली आहे. तर रात्रीतून झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुक्यातील केळणा, जुई, रायघोळ या नद्या दुधडी भरून वाहण्याला शनिवारी दुपारनंतर सुरूवात झाली. तर अति पाऊस झाल्याने या नद्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा शनिवारी दुपारी देण्यात आला आहे. भोकरदनच्या पुलाला लागले पाणी
भोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीची पानीपातळी वाढल्याने शनिवारी दुपारनंतर नदी दुथडी भरून वाहण्याला सुरूवात झाली होती. तर या नदीवर असलेल्या फुलांवरील वाहतुक दुपारी अडीच वाजेनंतर बंद करण्यात याव्यात अशा सूचना तालुका महसुलकडून देण्यात आल्या होत्या. या पात्रातून वाहणाऱ्या पाण्याची गती अतिजलद असल्याने ही गती पाहण्यासाठी बघ्यांनी भोकरदनच्या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पावसाने घरेही पडली


तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर रस्ते देखील पाण्याखाली आल्याने अनेक गावांतील वाहतुक थंाबवण्यात आली. रायघोळ, जुई, केळणा या ठिकाणी नदी-नाल्यानी धोक्याची पातळी ओलांडल्याने असल्याने नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे. दरम्यान या पावसात अनेकांच्या घराची पडझड झाली असून शेकडो हेक्टवरील जमीन खरडुन गेल्या आहे.भेाकरदनमध्ये अडकले 50 गावांतील ग्रामस्थ

दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शनिवारी दुपारनंतर भोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीला मोठा पुर आला. यामुळे नदी शिवारातील आव्हाना, गोकुळ, हिसोडा, कोळी कोठा, लेहा, शेलुद, वडोदतांगडा, पारध खुर्द, पारध बुद्रुक या गावांना तहसिलदार संतोष गोरड यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. दरम्यान, शनिवारी भोकरदन शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारात आलेल्या ५० गावांतील ग्रामस्थांना सायंकाळी चार वाजेनंतर आपल्या गावी जाणाऱ्या रस्ते बंद झाल्याने त्यांना भोकरदन मध्येच थंाबावे लागले.होत्याच नव्हतं झाल 


अवकाळी पावसाने सोयाबीन, मका, कपाशी पिके ही पूर्णतः नष्ट झाली आहे. या पिकावरच पुढील नियोजन शेतकऱ्यांचे होते. मात्र, आता सर्वच धुतले आहे. यासाठी शासनाने ताडडीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल.-  रामदास कोथळकर, शेतकरी वालसावंगीजे होत आता तेही गेलं 


शुक्रवारी रात्री झालेल्या धुव्वाधार पावसात जे काही शेतात उरलं होत ते ही निसर्गाच्या डोळ्यात आलं आहे. शुक्रवारी झालेल्या पावसात सगळंच उद्धवस्त झालं असल्याने आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे सगळी घडी विस्कटून गेली आहे.- शेषराव लोंखडे, शेतकरी, बराजंळा लोंखडेजमिनी चिभडल्या 

यंदा भोकरदन तालुक्यात सुरूवातीपासूनच चांगला पाऊस आहे. तसेच गेल्या तीन आठवड्यापासुन सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वर आली असल्याने शेतात देखील काळे पाणी फुटले असल्याने तालुक्यातील जवळजवळ पाच हजार हेक्टरच्यावर जमिनी चिभडल्या आहे अनेक ठिकाणचे शेतातील बांध फुटले असल्याने शेतातील शेकडो हेक्टरवरील पिके वाहुन गेली आहे. यामुळे आता रब्बी पेर देखील लांबणीवर जाणार आहे.तालुक्यात दिडशे टक्के पाऊस


 भोकरदन तालुक्यात सरासरी 662 मिमि पाऊस होतो. यावर्षी मात्र पावसाने सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले असुन आजपर्यंत 1001 मिमि पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 150 टक्के आहे. गतवर्षी तालुक्यात केवळ 366 मिमि पाऊस झाला होता. यावर्षी मात्र सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. तर परतीच्या पावसाने गेल्या 10 दिवसांपासून झोडपून काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...