आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळात जलप्रलय : शतकातील सर्वात प्रलंयकारी पूर, एका दिवसात १०६ बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नौदलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरने शुक्रवारी १६ जणांना वाचवले. - Divya Marathi
नौदलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरने शुक्रवारी १६ जणांना वाचवले.

तिरुवनंतपुरम- केरळात शतकातील सर्वात प्रलंयकारी महापूर आला आहे. गुरुवार अाणि शुक्रवारदरम्यानच्या भूस्खलन व पुरात १०६ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला. केरळात ८ ऑगस्टपासून १७८, तर पावसाळ्यातील एकूण बळींचा आकडा ३८५ वर गेला आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या ८० हजारांवर लोक पुराच्या पाण्यात अडकलेले अाहेत. १२ जिल्ह्यांतील ३ लाख १४ हजार लोक बेघर झाले अाहेत. त्यांना १५६८ मदत छावण्यांत ठेवले आहे. ८ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी रात्री केरळमध्ये दाखल झाले आहेत.

 

> 24 तासांपासून अहमदाबादसह गुजरातच्या अनेक भागात तुरळक पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत. 
> 15 लोक भावनगरमध्ये घर कोसळल्याने मृत्यू. अरावलीत वीज कोसळल्याने तरुणाचा मृत्यू. 
> 72 तासांत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. 

 

 

९४ वर्षांनंतर आलेल्या भीषण पुराचा सामना करणाऱ्या केरळमध्ये परिस्थिती वाईट बनली आहे. पूर व जमिन खचण्यामुळे राज्यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. बचाव व मदतकार्य सुरू आहे. बचाव कार्यात नौदल, सैन्य, हवाई दल, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहेत. तिरुवनंतपुरममध्ये गुरूवारी १४ पैकी१३ जिल्ह्यांत जारी करण्यात आलेला इशारा मागे घेण्यात आला आहे. रविवारपासून पूरग्रस्त भागातील पाऊस आेसरू लागेल. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य बघून मदत वाढवण्याची मागणी केली आहे. 


८० धरणांचे दरवाजे उघडले
> १९२४ नंतर शतकभरात केरळातील ही सर्वाधिक भीषण नैसर्गिक आपत्ती आहे.
> एनडीआरएफच्या ३९ लष्कराच्या १६, व २८ नौदल टीम बचावकार्यात आहेत. 
> राज्यातील ८० लहानमोठ्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
> रुग्णालयांत ऑक्सिजनची टंचाई असून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
> पेट्रोल, िपण्याच्या पाण्याची टंचाई आहे.

 

बातम्या आणखी आहेत...