आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लड रिपोर्ट: जगण्याची लढाई, मदतीचा महापूर; सहा दिवसांपासून जवान पाण्यात, पाय चिघळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पुराने वेढलेले घर.. सहा दिवस मृत्यूशी एकाकी झुंज.. अन् देवदूतांसारखे बोटींतून धावून आलेले जवान.. यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे विदारक आणि आगतिक भाव. अंगावरचे ओलेचिंब कपडे, छातीशी अन् पाठीशी जिवापाड कवटाळलेली एक पिशवी..  कुणाच्या कडेवर कुडकुडणारं तान्हुलं बाळ, तर कुणाच्या खांद्यावर थरथरणाऱ्या आजीचा हात... कुणी सहा दिवस घरात अडकून पडलेले, तर कुणी मदत मिळावी म्हणून जिवाच्या आकांताने मानेपर्यंतचे पाणी कापत निघालेले... अहो, आमचे म्हातारे आजोबा घरात आहेत, त्यांच्यासाठी फूड पॅकेट्स द्या, अशी आर्जवं करणारे काही जण, तर साडीची दोरी करून घरच्या सज्जावर उतरून, ‘मला आणि माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा बोटीत घ्या, नाही तर मी इथून उडी टाकीन’ असं धमकावणारी महिला ... सांगली शहराजवळच्या हरिपूरमधली ही दृश्यं पुराच्या रौद्रतेची साक्ष देत आहेत. परतून बाहेर येताच एक सुटकेचा नि:श्वास टाकतात. तेवढ्यात फोर व्हील ड्राइव्हच्या जीप येतात आणि त्यांना  शहरातील शाळांमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये घेऊन जातात.  साऱ्यांच्या मनाशी एकच प्रश्न आहे, पुढे काय? आता सांगली व परिसरात दिसतेय ती जगण्याची लढाई. प्रत्येक जण बचाव दलातील अधिकाऱ्यांना एकच प्रश्न करतोय.. होतं-नव्हतं सगळं गेलं.. सांग साहेबा काय करावं…? 
 
मागील काही दिवसांत इथल्या ७० हजार लोकांना पुरातून बाहेर काढले, तरी २ हजार लोक ठिकठिकाणी अडकल्याचे स्थानिक सांगताहेत. हरिपूर हे सांगलीचेच उपनगर. हरिपूरच्या शिवाजी मोहितेंच्या फोनवर काल दिवसभरात एक हजार फोन आले. कोणत्या घरात किती लोक अडकले आहेत याची माहिती देणारे ते फोन. गेल्या आठवडाभरापासून लाइट नसल्याने शेवटच्या घटका मोजणाऱ्या बॅटरीच्या मदतीने केलेले. हे निरोप येताच शिवाजी मोहितेंसारखे हरिपूरचे तरुण एन. डी. आर. एफ.च्या टीमशी त्वरित संपर्क करतात. फूड पॅकेट्सने भरलेली टीमची बोट या स्थानिक स्वयंसेवकांना घेऊन त्वरित फोन आला त्या ठिकाणासाठी निघते. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांनी बाल्कनीतून खाली सोडलेल्या बादल्यांमधून पाणी, दूध, औषधं, बिस्किटे आणि फूड पॅकेट्स पोहोचवते. मग रिकामी बोट दुसऱ्या घरांकडे मोर्चा वळवते. पहिल्यांदा लहान मुले, वृद्ध, आजारी, महिला या प्राधान्यक्रमाने सखल भागांतील घरांमध्ये अडकलेल्यांना खांद्यावर उचलून बोटीत आणतात. प्रत्येकाला लाइफ जॅकेट्स घालून सुरक्षित जागी आणले जाते. पथकाच्या मदतीने जमिनीवर पाऊल पडते आणि सगळ्यांंच्या पापण्या नवीन जन्म मिळाल्याच्या समाधानाने पुन्हा ओल्या होतात. सांगली शहरातील स्टेशन रोड, हरिपूर, पत्रकार कॉलनी या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्यात सध्या हेच दृश्य दिसत आहे. या ठिकाणी एनडीआरएफची १५ पथके २५ बोट्स घेऊन बचाव कार्य करत आहेत. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर इथली पाण्याची पातळी घटत आहे. 

सांगलीकरांना आता गोळ्या, औषधी अन् कोरड्या अन्नाची गरज
मागील तब्बल आठवडाभरापासून कोल्हापूर व सांगलीला पुराने वेढले आहे. अद्यापही अनेक जण पाण्यात अडकलेले असून त्यांना मदत करण्यासाठी राज्यभरापासून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सांगलीमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांसोबतच स्थानिक तरुणांनीही पुढाकार घेत आहेत. राज्यभरातील अनेक संस्थांचीही मदत सांगलीमध्ये दाखल होत असून सांगलीकरांपुढे आता आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.  त्यामुळे आता सांगलीकरांना गोळ्या, औषधी अन् कोरड्या अन्नाची गरज आहे. रोगराई पसरू नये म्हणून सरकार उपाययोजनाही करतेय.  

फूड पॅकेट्सची पोती आणि पिशवीभर पोळ्या, कुणाच्या खांद्यावर मिनरल बाटल्यांची खोकी, तर कुणाच्या डोक्यावर जनावरांसाठी चारा... असे चित्र सध्या जागोजागी सांगलीमध्ये दिसून येतेय. शहरांतील अनेक शाळा व महाविद्यालये सध्या गर्दीने ओसंडून गेली आहेत. हजारो लोक विस्थापित झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डोक्यावर पोळ्या, बिस्किटे
सांगली शहर सुधारणा समिती, एमआर असोसिएशन, जनकल्याण समिती, विसावा ग्रुप, संग्राम यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत केली जात आहे.  विशेष म्हणजे शहरातील कोरड्या परिसरातील नागरिक स्वत:हून पन्नास-साठ पोळ्या, बिस्किटचे पुडे आणि कपडे घेऊन येत आहेत.  
 
बातम्या आणखी आहेत...