आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Video: इतका भयंकर पूर की वाहून गेल्या बस, ट्रक; हिमाचल प्रदेशात ढगफुटी, पुराने हाहाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातला आहे. गेल्या 48 तासांपासून सुरूच असलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार आहे. मुसळधार पावसाने कुल्लू-मनाली राष्ट्रीय महामार्गासह 126 रस्ते बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर कुल्लूच्या ओट येथे ढगफुटीने 19 लोक अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून विमानतळावर सुखरूप सोडण्यात आले. यासंदर्भात फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये अख्खी बस आणि अख्खे ट्रक पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसून येतात. पुरात अडकलेल्या सर्वच नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ठिक-ठिकाणी बचाव मोहिमा सुरू आहेत. 


मनालीत बस, कुल्लूत ट्रक गेले वाहून...
कुल्लूच्या पोलिस उपायुक्तांनी नागरिकांना नदी, नाल्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच, अतिवृष्टीच्या परिस्थितीत उंच ठिकाणी राहावे असे आवाहन केले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यात सर्वात वाइट परिस्थिती मंडी आणि हमीरपूर जिल्ह्यांत आहे. येथे जवळपास सर्वच नद्यांना पूर आले आहे. चंबा जिल्ह्याला जोडणाऱ्या शंभर वर्षे जुन्या शितला ब्रिजला सुद्धा दरी पडली आहे. तर रोहतांग दर्रामध्ये बर्फवृष्टीमुळे 28 लोक अडकले आहेत. मनालीत व्हॉल्वो बस आणि कुल्लूत चक्क ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...