आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Floppy, Signed By Steve Jobs, Is Sold For 60.14 Lac, Including A Copy Of Macintosh System Tools Version 6.0

स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेली फ्लॉपी 60.14 लाखांत विकली, यात मॅकिंटोज सिस्टीम टूल्स व्हर्जन 6.0 ची कॉपी सेव्ह आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : अॅपलचे को-फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेली एक फ्लॉपी-डिस्क 60.14 लाख रुपयांमध्ये विकली गेली. या फ्लॉपी डिस्कचा लिलाव करत असलेल्या आरआर ऑक्शन हाउसने याची किंमत 5.4 लाख रुपये ठेवली होती. 4 डिसेंबरला झालेल्या लिलावात या फ्लॉपी डिस्कला ठरवलेल्या किमतीपेक्षा सुमारे 1000 टक्के जास्त किमंत मिळाली. या फ्लॉपी डिस्कमध्ये अॅपलचे मॅकिंटोज सिस्टीम टूल्स व्हर्जन्स 6.0 ची एक कॉपी सेव्ह आहे. डिस्कच्या लेबलवर काळ्या पेनाने केलेली स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी आहे. 


ऑक्शन हाउसच्या वेबसाइटवरुन दिलेल्या माहितीनुसार, ही फ्लॉपी उत्तम कंडीशनमध्ये आहे आणि यावर इंक मार्क आहे. यापूर्वीही स्टीव्ह जॉब्सची साइन केलेल्या टॉय स्टोरी चित्रपटाच्या पोस्टरचा लिलाव केला होता. या पोस्टरची किंमत बोली लावण्यापूर्वी 25,000 डॉलर (1793000 रुपये) ठरवली गेली होती. पोस्टर 31,250 डॉलर (2240000 रुपये) मध्ये विकले गेले होते. 

मागच्यावर्षी जॉब्सच्या सहीची किंमत 35 लाख रुपये होती...  


ऑक्शन कंपनीच्या लिस्टिंगमध्ये माहिती देण्यात आली की, जॉब्स खूप कमी सह्या करायचे. अनेकदा ऑटोग्राफच्या मागणीला नकार द्यायचे. हेच कारण आहे की, जॉब्स यांच्या सह्या नेहमी मौल्यवान राहिल्या आहेत. डिसेंबर 2018 मध्ये पॉल फ्रेसरच्या कलेक्टिबल्स ऑटोग्राफ इनडेक्समध्ये दावा केला गेला होता की, स्टीव्ह जॉब्स यांच्या ऑटोग्राफची किंमत 50,000 डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) पेक्षा जास्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...