Home | International | Other Country | Florida man jokingly tries to pawn baby, shop owner complains to police

मुलाला काउंटरवर बसवले, दुकानदाराला म्हणाला- याची किती किंमत मिळेल?

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 02:18 PM IST

व्यक्ती दुकानातून बाहेर जाताच दुकानदाराने पोलिसांना फोन केला

 • Florida man jokingly tries to pawn baby, shop owner complains to police

  वॉशिंग्टन- अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने दुकानदारासोबत केलेली मस्करी त्याच्यावरच उलटी पडली. ब्रायन स्लोकम मागच्या आठवड्यात आपल्या 7 महिन्यांच्या मुलाला घेऊन एका पॉन शॉप (जुन्या वस्तू खरेदी विक्रीचे दुकान)मध्ये पोहचला. येथे त्याने आपल्या मुलाला काउंटरवर ठेवले आणि याची किती किंमत देता असे विचारले. ब्रायनने हे सर्व मस्करीतच केले होते, पण दुकानाच्या मालकाने याची माहिती पोलिसांना दिली आणि ब्रायनला चौकशीसाठी पोलिस स्टेशनममध्ये जावे लागले.

  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यात ब्रायन आपल्या मुलाला काउंटरवर बसवताना दिसत आहे. तो दुकानदार रिचर्ड जॉर्डनला म्हणतो, "माझा मुलगा 7 महिन्यांचा आहे, याचा जास्त वापरदेखील झाला नाहीये. मला याला गहाण ठेवायचे आहे, याची किती किंमत मिळेल"?


  मुलाला गहाण ठेवण्यावर ठाम होते वडील
  रिचर्डला ब्रायनची ही मस्करी समजली नाही आणि त्याने पोलिसांना याची सुचना दिली. रिचर्डने एका स्थानिक न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखातीत सांगितले की, मुलाला गहाण ठेवण्यावर ब्रायन ठाम होता. ब्रायनने आपल्या मुलाला हवेत भिरकावले आणि काउंटरवर ठेवून याला गहाण ठेवायचे आहे असे म्हणाला.


  पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज जारी केले
  दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ब्रायनचा तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज जारी केली. ब्रायनने ती फुटेज पाहिल्यावर स्वतःहून पोलिसांना संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी ब्रायनला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.


  गुन्हा दाखल झाला नाही
  चौकशीदरम्यान ब्रायनने सांगितले की, ही सगळी मस्करी होती. त्याला फक्त घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा होता. पोलिसांनी ब्रायनवर कोणताच गुन्हा दाखल केला नाही. पण अमेरीकेच्या सोशल सर्विसला मुलावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Trending