आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्काय डायव्हिंगचे वेड असलेल्याची विमानातून उडी घेताना गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साहसी खेळाचे वेड असलेले ब्लेक मिलर व लॉरा, प्रस्तावानंतर हॉट एअर बलूनमध्ये लग्न करण्याची आहे इच्छा
  • २ महिन्यापासून सुरू होती कल्पना, योग्य उडीची पाहात होते वाट

मियामी - सर्वसामान्यांसाठी लाेकांसाठी स्काय डायव्हिंगची कल्पना करण्यानेही अनेक प्रकारचे टेन्शन्स येतात. मात्र, जगातील काही व्यक्तींना अॅडव्हेंचरशिवाय दुसरे काही सुचतच नाही. फ्लाेरिडातील ब्लेक मेलर अशा व्यक्तीपैकीच एक आहेत. त्यांना व त्यांची गर्लफ्रेंड लॉराला स्काय डायव्हिंगची इतकी आवड आहे की,  ब्लेकने लॉराला स्काय डायव्हिंग करत जमिनीवर उतरत असताना लग्नाची मागणी घातली.  आता त्यांचे लग्नही जमिनीवर होणार नाही. कारण त्यांची यासाठीही वेगळीच योजना आहे. या दोघांना हॉट एअर बलूनमध्ये लग्न करायचे आहे. या लग्नासाठी त्यांचा तीन महिन्याचा मुलगा फीनही तेथे हजर असणार आहे. २ महिन्यापासून सुरू होती कल्पना, योग्य उडीची पाहात होते वाट


ब्लेक म्हणाले, आम्ही दोघांना स्काय डायव्हिंगचे इतके वेड आहे की, मला लॉराला प्रपोज करण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली कल्पना सुचली नव्हती. गेल्या दोन महिन्यापासून प्रपोज करण्याची तयारी करत होतो. त्यासाठी योग्य अशी उडी घेण्याची वाट पाहात होतो. प्रत्येक वेळी स्काय डायव्हिंगला जाताना माझ्या खिशात अंगठी ठेवत होतो. परंतु कधी हवामान खराब असायचे. तर कधी योग्य वेळ येत नव्हती. शेवटी काही दिवसापूर्वी तशी संधी मिळाली. माझा मित्र जोश यास परवाना मिळाला होता. त्याला हेल्मेटवर कॅमेरा बसवता येऊ शकत होता. त्यानेच माझ्या प्रपोजलचा व्हीडिअो तयार केला. मी खूप नर्व्हस होतो. लॉरा अधिक भावनिक झाली असती आणि स्काय डायव्हिंगवेळी उडी घेताना, काही अडचण येऊ नये. यासाठी उडी घेण्यापूर्वी गुडघे टेकून बसलो. माझ्या मनात याची उजळणी केली. त्यानंतर तिला प्रपोज केले. तिलाही आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. लॉराला प्रपोज करताच ती चकितच झाली. लाॅरा म्हणाली, ब्लेक माझ्याशी लग्न करू इच्छितो अशी मला अपेक्षा नव्हती. ब्लेक विमानात येरझाऱ्या मारत होता. त्याला तसे फिरताना पाहून मला काळजी वाटत होती. अचानक माझ्यासमोर गुडघ्यावर बसला आणि मला विचारले, लॉरा, तू माझ्याशी लग्न करशील? तेव्हा मी हो म्हटले.  ब्लेकने मला अंगठी घातली आणि उडी घेताना ती अंगठी सांभाळून ठेवण्याची चिंता वाटत होती. घाईघाईत अंगठी पडू नये, याची भिती वाटली. आता हॉट एअर बलूनमध्ये लग्नाची योजना आहे. स्काय डायव्हिंग करताना अनेक प्रकारे जम्प घेण्याचे वेगवेगळे परवाने असतात. आता बी परवाने असलेले स्काय डायव्हर्स होण्यासाठी आम्हाला दहा उड्या घ्यायच्या आहेत. परवाना मिळताच आम्ही हेलिकॉप्टर व हॉट एअर बलूनने जम्प करु शकतो तेव्हाच लग्न होईल. 

बातम्या आणखी आहेत...