आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशात दिसली उडती तबकडी; अचानक त्यातून जे निघाले ते पाहून उडाली एकच खळबळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन डिएगी- पृथ्वीवरून दिसणारे मोकळे आभाळ हजारो रहस्यांनी गुंतले आहे. ते सोडवण्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत करत आहे. वैज्ञानिकांच्या मते पृथ्वी व्यतिरिक्त बाह्यजगातही जिवन आहे. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही दावा केला असून पृथ्वीबाहेरही जिवसृष्टी असल्याचे त्यांचे मत आहे. आतापर्यंत लोकांनी अनेकवेळा आकाशात एलियन्सची तबकडी दिसल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे. आकाशात एक चमकदार वस्तु उडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून अनेक लोकांनी ती तबकडी असल्याचा दावा केला आहे.

 

चमकणारी वस्तु जेव्हा अचानक हवेत थांबते...

> सॅन डिएगी शहरात मोकळ्या आकाशात वेगाने एक चमकदार वस्तु आकाशातून जमिनीवर कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आकाशात उडणारी ती वस्तू आकाराने खुपच मोठी आहे. त्यानंतर ती वस्तु अचानक काही सेकंदासाठी हवेत थांबून दोन भागांत विभागताना दिसत आहे. या व्हिडिओला रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचे नाव क्रिस विल्सन असून त्याने हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी सांगितले की, हा व्हिडिओ ज्या ठिकाणी रेकॉर्ड केला आहे ती जागा नासाचे केंद्र आहे. नेहमीच तिथे सैन्य परिक्षण करत असताना असे दृश्य दिसते. 

 

बातम्या आणखी आहेत...