आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नियाेजित नवीन अाराखडा रद्द करून जुन्याच अाराखड्यानुसार पूल उभारणी करावी अन्यथा या प्रश्नी अांदाेलन उभारण्यात येईल, असा इशारा शिवाजीनगरातील सुमारे १२५ नागरिकांनी दिला अाहे. सर्व स्थानिक अधिकारी व लाेकप्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांना शिवाजीनगरच्या रहिवाशांनी याबाबतचे निवेदन दिले अाहे. शनिवारी सकाळी नागरिकांच्या शिष्टमंडळाने भाजप कार्यालयात जाऊन शहराचे अामदार सुरेश भाेळे यांना तसेच महापालिकेत जाऊन अायुक्त चंद्रकांत डांगे यांनाही निवेदन दिले. शिवाजीनगर उड्डाणपुलाची मुदत २०१३ मध्येच संपली अाहे. त्यामुळे ताे वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पाडण्यात येणार अाहे. राज्यशासन व रेल्वे प्रशासन दाेन्ही मिळून या नवीन पुलाची उभारणी करणार अाहेत. यासाठी १८ एप्रिल २०१७ मध्ये पुलाचा अारखडा तयार करण्यात येऊन त्याला २५ एप्रिल २०१७ राेजी मंजुरी देण्यात अाली अाहे. या अारखड्यानुसार अाज ज्या स्थितीत पूल उभा अाहे, तशाच पुलाची नव्याने उभारणे करणे प्रस्तावित हाेते. त्यामुळे नवीन जागा अधिग्रहण किंवा बदल करण्याची गरज नव्हती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालिकेकडून पर्यायी रस्त्यांवर लक्ष...
उड्डाण पुल पाडून नव्याने बांधण्यात येणार अाहे. पुल पाडण्याच्या कामाला पंधरा दिवसात सुरुवात हाेणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या अाठवड्यातच जाहिर करण्यात अाले हाेते. पुल पाडल्यानंतर शिवाजी नगरातून शहरात येण्यासाठी समांतर बाेगदा, ममुराबाद रस्त्यावरील लेंडीनाल्यांवरील पुल व थेट महामार्ग हेच पर्याय अाहेत. सर्वाधिक साेयीचा म्हणून सुरत रेल्वेगेटवरून एसएमअायटी काॅलेजवरून समांतर बाेगद्यामार्गे वाहतुकी वळेल असा महापालिकेला अंदाज अाहे. ही वाहतूक थेट बहिणाबाई उद्यानापर्यंत जाईल.
साेमवारपासून सर्वेक्षण : पिंप्राळा रेल्वेगेट ते बहिणाबाई उद्यान या रस्त्याची रुंदी २४ मीटरची असतांना प्रत्यक्षात जागेवर रस्ता ठिकठिकाणी अरुंद झालेला अाहे. त्यामुळे वाहतुकी काेंडी हाेते. तसेच सुरत रेल्वे गेट ते समांतर बाेगदा या रस्त्यावर अनेक ठिकाणी नाल्याचा मार्ग बदलून अनेक पक्की बांधकाम झाली अाहे. या रस्त्यांवरील वाहतूक वाढल्यानंतर माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडी हाेईल.यासाठी या दाेन्ही या रस्त्यांचे साेमवारपासून सर्वेक्षण करण्यात येऊन लगेच अतिक्रमण हटविण्यात येणार अाहे.
असा अाहे नियाेजित अाराखडा
मंजूर अाराखडा रद्द करून नव्याने नियाेजित अाराखडा राबवण्यात येणार अाहे. यानुसार टाॅवरकडून येणारा रस्ता शिवाजीनगरातील दूध संघाकडे जाणारा मार्ग तसाच राहणार अाहे. मात्र, या पुलाला अाज ज्या ठिकाणी शिवाजीनगरात उतरण्यासाठी असलेल्या जिन्याच्या जागेवरून ममुराबाद गावाकडे जाण्यासाठी पुलाचे दुसरे टाेक असणार अाहे. यासाठी दूध संघाकडून येणारा मार्ग ममुराबाद रस्त्याकडे जाण्यासाठी शिवाजीनगरातील साळुंखे चाैकापर्यंत नेण्यात येऊन ताे पुन्हा वळून ममुराबाद रस्त्यांवर जाणार अाहे.
काय हाेईल परिणाम
नियाेजित अाराखड्यानुसार ८० वर्षांपासून दाटवस्ती असलेल्या शिवाजीनगरातील या भागात रहिवास अाहे. त्याचप्रमाणे मुस्लिम व बाेहरा समाजाचे प्रार्थना स्थळ अाणि प्राथमिक शाळा अाहे. त्यामुळे सुमारे १५ हजार लाेकांना त्याचा फटका बसणार असल्याचा दावा या निवेदनकर्त्यांनी केला अाहे. शहराच्या बाहेरून महामार्ग नेण्यासाठी ३५ ते ४० वर्षांपूर्वी नागपूर-सुरत महामार्ग हलवण्यात अाला हाेता, असे असताना अाता पुन्हा नागरी वस्तीतून नेण्यात येत अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.