आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात शेळ्या आणि मेंढ्यांसाठी प्रथमच सुरू करणार चारा छावणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टँकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देशदेखील चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिले. तसेच औरंगाबाद विभागीय आयुक्तांना चारा छावण्यांसाठी १११ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. 

 

चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विविध विभागांचे अपर मुख्य, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले, राज्यात सध्या ६२०९ टँकर्सच्या माध्यमातून ४९२० गावे आणि १० हजार ५०६ पाड्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण १५०१ चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे दहा लाख ४ हजार ६८४ जनावरे आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...