आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकविद्यापीठ : शिक्षणाचा एक आदर्श मार्ग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या घरातील नोकर मंडळी नेहमीच विविध कारणांसाठी अॅडव्हान्स रक्कम मागत असतात, पण या वेळी एक वेगळेच कारण समोर आले. घरातील मोलकरणीने २ हजार रुपये अॅडव्हान्स मागितल्यानंतर त्याचे कारण सांगताना ती म्हणाली, की टॅक्सी चालवणाऱ्या तिच्या नवऱ्याने वेगमर्यादा तोडल्याने त्याला दोन हजारांचा दंड झाला आहे. यामुळे आमचे सगळे बजेट गडबडले आहे. कारण हा खर्च पतीच्या इंधन खर्चाबरोबरचा आहे. १ सप्टेंबरपासून जो नवीन मोटार वाहन अधिनियम कायदा राबवण्यास सरकारने सुरुवात केली आहे, त्याचे हे परिणाम. यावरून एक आठवले. ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कोणीही चेन्नईच्या धंडपाणी व्यक्तीचे नाव जरूर लक्षात ठेवले पाहिजे. चेन्नईपासून ११४० किमी दूरवर असलेली मूळ धर्मपुरी जिल्ह्यातील ही व्यक्ती किशोरवयात खिशात केवळ ७ रुपये घेऊन चेन्नईत आली होती. नंतर दहा वर्षे लहानमोठी कामे करत कसेबसे पैसे जमा करत त्याने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. लग्नानंतर तीन मुलांचा पिताही झाला, पण शिक्षणाचे महत्त्व विसरला नाही. सकाळी ७ ते रात्री दहा या काळात रिक्षा चालवून त्याने मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. त्याने असेही पाहिले की, त्याच्यासोबतचे सर्व रिक्षाचालक वाहनाच्या वरच्या भागात सिनेनट-नट्या आणि राजकीय नेत्यांचे फोटो लावतात. चेन्नईसारख्या धावपळीच्या शहरात अशा फोटोंच्या संगतीत भन्नाट वेगाने रिक्षा पळवत वेगमर्यादा तोडणे किंवा सिग्नल तोडणे यात मोठा पराक्रम केल्यासारखे वाटत असते. हे लक्षात घेऊन ५८ वर्षीय धंडपाणी याने आपल्या रिक्षात ड्रायव्हिंग सीटच्या समोर आपल्या कुटुंबाचा फोटो लावण्यास सुरुवात केली. किमान त्या फोटोकडे पाहून आपले घरात कोणीतरी वाट पाहणारे आहे, या भावनेने आपण रिक्षा वेगाने पळवणार तर नाही व दुर्घटनाही टळेल हा हेतू यामागे होता. कोणतीही जोखीम घेण्यास कुटुंबाचे हे छायाचित्र आपल्याला रोखते, असे तो म्हणतो.   तिकडे मुलांचे शिक्षण चालू होते आणि पत्नी घरचे सर्व काही पाहत असे. वाहनाच्या धडकेत रस्त्यावर मेलेली जनावरे पाहून धंडपाणीला वाईट वाटत असे. म्हणून त्याचा मुलगा दिनेश याला त्याने पशुवैद्यकीय विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला लावला. दिनेशला आपल्या वडिलांचा हेतूच समजला नाही. जेव्हा प्रवेश घेण्यासाठी काउन्सेलिंगच्या तारखेची घोषणा झाली तेव्हाच त्याला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आज धंडपाणी तीन सक्षम ग्रॅज्युएट मुलांचा पिता आहे. या प्रगतीचा त्याला अभिमान वाटतो. या मुलांपैकी एक आहे पशुवैद्यकीय डॉक्टर, दुसरा सिव्हिल इंजिनिअर तर तिसरा लेक्चरर आहे. आपल्या मुलांना इंग्रजी बोलताना पाहून त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. सुदैवाने त्याची ही कर्तबगार मुले आपल्या वडिलांकडे रोल मॉडेल म्हणून पाहतात. तो ज्या व्यवसायात आहे, तेथे सिग्नल तोडणे, दंड भरणे, अपघात ही सामान्य गोष्ट आहे. पण धंडपाणीला आयुष्यात कधी अशा गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ आली नाही. फंडा असा : तुम्हाला अक्षरज्ञान नसेल तर फार काही बिघडत नाही. हे जीवन तुम्हाला अशा अनेक संधी देते, जेव्हा तुम्ही लोकांमध्येच राहून त्यांच्या 'संगतीच्या विद्यापीठातच' स्वत:ला शिक्षित करू शकता. होय, पण असे करण्याची शपथ घेणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...