शेअर मार्केटमधून तुम्हीही / शेअर मार्केटमधून तुम्हीही कमावू शकतात कोट्यवधी रुपये...जाणून घ्या, या 5 गोल्डन टिप्स

Oct 31,2018 02:58:00 PM IST

नवी दिल्ली- पैसा कमवण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल तर शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नाही. अल्प गुंतवणुकीतही तुम्ही मोठा लाभ मिळवून अल्पावधी कोट्यधीश होऊ शकतात. तुम्हाला फक्त शेअर मार्केटच्या काही बेसिक नियमांवर लक्ष द्यावे लागेल.

शेअर मार्केटच्या नियमांचे अनेक मोठे गुंतवणुकदार पालन करतात. त्यात देशातीलच नव्हेत विदेशातील उद्योगपतींचा समावेश आहे. तुम्हालाही शेअर मार्केटमधून चांगली कमाई करायची असेल तर आम्ही आपल्यासाठी 5 महत्त्वाच्या मनी टिप्स घेऊन आलो आहोत.

वॉरेन बफे, राकेश झुणझुणवाला आणि आरके दमाणीसारखे टॅापचे गुंतवणुकदार या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. या फॅार्म्युल्याचा वापर करुन हे दिग्गज अल्पवधीत कोट्याधीश बनले आहेत. राकेश झुणझुणवाला आणि आरके दमाणी हे देशातील टॉप तर वॅारेन बफे जगातले टॅाप उद्योगपती आहेत.

वेळची प्रतिक्षा करू नका
> वॉरेन बफे यांनी सांगितले आहे की, वेळेची वाट पाहु नका. मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ योग्य असते. एखादी कंपनीचा इतिहास दर्जेदार आहे. परंतु मार्केट डाऊन असेल तरीही अशा कंपनीत गुंतवणूक सुरू करा.

> सामान्य गुंतवणुकदार योग्य वेळेची प्रतिक्षा करतात. त्यामुळे ते गुंतवणूक करु शकत नाहीत. वेळ निघून जाते तेव्हा वरच्या स्टॅाकमध्ये गुंतवणूक करुन त्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... इतर टिप्स...

दुसऱ्याचे अनुकरण करुन पैसा गुंतवू नका... > तुम्ही दुसर्याची कॉपी करून शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत असाल, तर तुम्हाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा एकच मंत्र आहे, आपण लोकांना फॅालो करायचे नाही. लोकांनी आपल्याला फॅालो करायला हवे. किमतीवर जाऊ नका, व्हॅलू पाहा... > शेअरमध्ये पैसा गुंतवणूक करण्याआधी पाहु नका की, शेअरची किंमत किती आहे. ती जास्त आहे म्हणजे हे शेअर चांगले आहेत. कधी-कधी 50 ते 100 च्या मधले शेअरही जास्त मोबदला देऊन जातात. > स्टॉक मार्केटचे मोठे गुंतवणुकदार राकेश झुणझुणवाला म्हणतात की, कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करताना आधी कंपनीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी. पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... इतर महत्त्वपूर्ण टिप्स...डिव्हिडेंड देणाऱ्या कंपन्यावर विश्वास ठेवा... > फॉर्च्युन फिस्कलचे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांनी सांगितले की, गुंतवणूक करण्याआधी कोणत्या कंपन्या रेग्युलर डिव्हिडेंड देतात. एखादी कंपनी रेग्युलर बेसिसवर डिव्हिडेंड देत असेल तर याचा अर्थ असा की, त्या कंपनीकडे पैशांची कमतरता नाही. कॅश सरप्लस वाल्या कंपन्यांचे कामगिरी देखील उत्तम असते. या कंपन्यामध्ये पैसे गुंतवल्यास जलद गतीने तुमचा पैसा वाढतो. कमी कर्ज असलेल्या कंपन्यांची निवड करा... > गुंतवणूक करण्यापूर्वी, त्या कंपनीवर किती कर्ज आहे ते पाहून घ्या. कमी कर्ज असलेल्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवल्यास जोखीम कमी असते. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्या याचे उत्तम उदाहरण आहे.
X