आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'येवले अमृततुल्य चहा'वर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; आरोग्यास अपायकारक पदार्थ वापरल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील प्रसिद्ध ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका दिला आहे. येवले अमृततुल्य चहाच्या नमुन्यांध्ये त्रुटी आढळल्यामुळे चहा पावडर, चहाच्या मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यास अपायकारक असलेल्या ‘मेलानाईट’ पदार्थ वापरल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली.
 
 

पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश 
‘येवले चहा’ची चहा पावडर, साखर, चहाचा मसाला असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा माल पुण्यातून जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 

कोणकोणत्या त्रुटी आढळल्या?
> विक्री पॅकेटवर नियमानुसार आवश्यक माहितीचं लेबल नव्हते. 
> पॅकेटमधील अन्नपदार्थ आणि घटकपदार्थांच्या प्रमाणाचीही माहिती नाही.
> अन्नपदार्थाची प्रयोगशाळेकडून तपासणी केली जात नाही.
> उत्पादन नियंत्रणासाठी तज्ञ व्यक्तीची नेमणूकही केलेली नाही.
> उत्पादनाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...