आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाईट कंपन्या ग्राहकांना अस्वच्छ ठिकाणांहून पुरवतात अन्न; एफडीएच्या पाहणीतून उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वेगवेगळ्या संकेतस्थळावरून खाद्यपदार्थ घरपोच मागवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या पाहणीत वेबसाइट कंपन्या अस्वच्छ ठिकाणांहून ग्राहकांना अन्न पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्विगी, झोमॅटो, फुडपांडा, उबर-इट्स या वेबसाइट कंपन्यांना अन्न आणि ओषध प्रशासनाने नोटीस पाठवली आहे.  

 

ज्या हॉटेल्समधून या कंपन्या अन्नपदार्थ घरपोच देतात. त्या मुंबईतील 113 अस्थापनांकडे परवाना देखील नसल्याचे एफडीएच्या पाहणीतून उघडकीस आले आहे. यातील 85 आस्थापना या स्विगी, 50 आस्थापना झोमॅटो, 3 अस्थापना फुडपांडा आणि 2 आस्थापना या उबरइट या संकेतस्थळाशी संलग्न आहेत. त्यामुळे या आस्थापनांवर अन्न सुरक्षा माणदे कायदा अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली असून त्यांच्या उत्तरानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...