आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीलचेअरवर करत होता फूड डिलिवरी, कंपनीने दिली इलेक्ट्रिक सायकल भेट; डिलिवरी बॉयने मानले आभार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - झोमॅटोमध्ये डिलीवरीचे बॉयचे काम करणारा दिव्यांग युवक रामू साहू सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चा होत आहे. फूड डिलीवरी सर्व्हिस अॅपने त्याला एक इलेक्ट्रिक सायकल भेट दिली. झोमॅटाच्या या कामाचे इंटरनेटवर कौतूक होत आहे. काही युझर्सनी रामूला एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणत त्याचे देखील कौतूक केला आहे.    

राजस्थानचा रहिवासी आहे रामू
रामू राजस्थानचा रहिवासी आहे. तो व्हीलचेअरवर झोमॅटोसाठी जेवण पोहोचवत होता. एकाने त्याचा व्हिडिओ बनवून ट्विटरवर पोस्ट केला. झोमॅटोच्या संस्थापकांना ही बाब समजताच त्यांनी रामूला इलेक्ट्रिक सायकल देण्याचा निर्णय घेतला. झोमॅटोच्या संस्थापकाने स्वतः आपल्या ट्विटर रामूचा व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली. 

त्यांचे म्हणणे आहे की, या इलेक्ट्रिक सायलकच्या मदतीने रामू आणखी चांगल्याप्रकारे आपले काम करू शकेल. त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणा जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 

 

रामूने मानले झोमॅटोचे आभार
झोमॅटोकडून एक फोटो ट्विट करण्यात आला होता. यामध्ये लिहिले होते, आमचा डिलिवरी बॉय रामूने सन्मानपूर्वक इलेक्ट्रिक सायकलचा स्वीकार केला आहे. रामूला सायकल देण्याचा निर्णय कंपनीने काही दिवसांपूर्वीच केला होता. रामूने इलेक्ट्रिक सायकलसाठी कंपनीचे आभार मानले आहेत.