आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही व्यायाम करत असाल तर हे खाद्यपदार्थ जरूर खावेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यग्र जीवनशैलीत करण्यात येणाऱ्या व्यायामाचा उद्देश काहीही असो; परंतु व्यायामाच्या आधी व नंतर सेवन करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना विशेष महत्त्व असते. आणखी चांगला व्यायाम करण्यासाठी कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे याबाबत जाणून घेऊया. 


बदाम : यामध्ये फायबर्स, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. २००२ मध्ये झालेल्या एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ई जीवनसत्त्व हे स्नायूंना बळकट करणारे चांगले अँटिऑक्सिडंट आहे. 


केळी : व्यायाम करण्यापूर्वी किंवा नंतर केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. केळीमध्ये नैसर्गिक साखरेसोबतच पोटॅशियम, जीवनसत्त्व ब-६, जीवनसत्त्व 'क' आणि मॅग्नेशियम असते. केळी खाल्ल्याने हृदयाची कार्यप्रणाली, रक्तप्रवाह सामान्य राहतो आणि स्नायूंचा थकवाही दूर होतो. 


अननस : हे फळ खाल्ल्याने स्नायूंचा लवचीकपणा वाढतो आणि स्नायूंना बळकटी मिळते. यामध्ये असलेले एंझाइम्स जेवणात असलेल्या प्रथिनांच्या 'ब्रेक-डाऊन' प्रक्रियेसाठी उपयोगी असतात. ते दुखापतग्रस्त पेशींचे नूतनीकरण करतात. 


चॉकलेट मिल्क : एका संशोधनानुसार यामध्ये असलेल्या कर्बोदके आणि प्रथिनांमुळे व्यायामादरम्यान थकलेल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ५०० मिली 'फॅट फ्री' चॉकलेट मिल्कपेक्षा जर स्पोर्ट््स ड्रिंक घेतले, तर त्यात जेवढी कर्बोदके असतील तेवढ्याच कॅलरीसुद्धा असतील. त्यामुळे चॉकलेट मिल्कपेक्षा दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...