आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायाम हा उपाशीपोटीच केला पाहिजे, हे चुकीचे! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यायाम करून फॅट कमी करणाऱ्यांमध्ये एक समज असा असतो की, रिकाम्यापोटी व्यायाम केल्यास फॅट लवकर कमी होतात. पण यात फार तथ्य नाही. इंडियन स्पायनल इंज्युरिज सेंटर, नवी दिल्ली येथील वरिष्ठ आहार तज्ज्ञ डॉ. हिमांशी शर्मा यांनी सांगितले की, व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीरात ग्लुकोज असणे खूप आवश्यक आहे. शरीरात ग्लुकोज संपले असेल तर फॅट कमी करणारी प्रक्रियाच काम करणार नाही. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी थोडा नाष्टा किंवा हलका प्रथिनयुक्त आहार अवश्य घ्या. 


जे लोक उपाशीपोटी व्यायाम करून कॅलरीज बर्न करू इच्छितात, त्यांचे शरीर अशक्त होते. स्नायू आकसले जातात. एखाद्या व्यक्तीचे वय, बॉडी मास इंडेक्स, लिंग आणि दिनचर्या यावर फॅट कमी होण्याची प्रक्रिया अवलंबून असते. कॅलरीज बर्न करण्यासाठी ताकद लागते. पण उपाशी राहिल्याने ती मिळत नाही. हलका आहार घेतल्यावर काही वेळाने व्यायाम करावा. व्यायामानंतर स्ट्रेचिंग करावे. यामुळे जास्त परिणाम मिळतात. 


- सकाळी आपली चयापचय प्रक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी उपाशीपोटी व्यायाम केल्यास अनेक दुुष्परिणाम होऊ शकतात. उदा. शरीर सुस्त होणे, नैराश्य येणे, थंडी किंवा उष्णता वाढल्याने रक्तदाबही कमी होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...