Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | food for increase brain power

तल्लख मेंदूसाठी आहारात अवश्य समाविष्ट करा हे पदार्थ

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 17, 2019, 12:15 AM IST

जंक फूडकडे सर्वांचा कल बघता शरीराला पोषक तत्त्वांची कमी भासू लागते. या कारणामुळेच शारीरिक आणि मानसिक विकासावर प्रभाव पडतो.

 • food for increase brain power

  जंक फूडकडे सर्वांचा कल बघता शरीराला पोषक तत्त्वांची कमी भासू लागते. या कारणामुळेच शारीरिक आणि मानसिक विकासावर प्रभाव पडतो. लठ्ठपणा, आजार अशा समस्या दिसू लागतात. आज सर्वांना आहाराची गरज आहे, ज्याने मेंदूचे आरोग्य सुधारेल. मेमरी वाढवण्यासाठी हे काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यामुळे मेंदू निरोगी राहील.


  अंडी : प्रोटीनने भरपूर अंडी केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर मेंदूच्या विकासासाठी एक समृद्ध स्रोत आहे. अंड्यांत कोलीन नामक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात आढळते, ज्याने मेंदूचा विकास होतो. वेगवेगळ्या रेसिपीद्वारे अंड्याचे सेवन करता येऊ शकते. बॉइल एग, दुधात कच्चे अंडे, सॅलड, ऑम्लेट, हाफ- फ्राय किंवा सॅँडविचमध्ये अंड्याची स्लाइस घालूनदेखील याचे सेवन करणे उत्तम ठरेल.


  हळद : अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणांनी भरपूर हळद मुलांच्या मानसिक शक्तीत सुधारणेसाठी उपयुक्त खाद्यपदार्थांपैकी एक आहे. हळदीत आढळणारे करक्युमिन नामक तत्त्व मेंदूत काही कारणांमुळे आलेल्या सूज आणि अल्झायमरसारख्या आजारांना लढा देण्यासाठी मजबूत करतात. ज्यामुळे मेंदूचा विकास जलद गतीने होतो आणि बुद्धी तल्लख होते.


  हिरव्या भाज्या : भाज्या म्हटले की लहान काय, मोठेदेखील तोंड वाकडे करतात. परंतु हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन्सने भरपूर असतात. मेंदूच्या विकासासाठी भाज्या अत्यंत आवश्यक असल्याचे आढळते. म्हणून आहारात अधिक प्रमाणात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हिरव्या भाज्या मेंदूव्यतिरिक्त शरीरातील इतर अवयवांसाठीही फायदेशीर ठरतात.


  दूध : दूध संपूर्ण आहार असल्याचे म्हटले जाते. दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते, जे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे. दूध पिण्याने मुलांची हाडे मजबूत होतात आणि मेंदूचा विकासदेखील होतो. म्हणून दररोज एक ग्लास दुधाचे सेवन अवश्य करावे.


  दही : दूध न आवडणाऱ्यांसाठी दहीदेखील एक उत्तम पर्याय आहे. दह्यात दुधापेक्षा अधिक कॅल्शियम आढळते आणि पचनदेखील सुरळीत होते. दही व्हिटॅमिन बी आणि प्रोटिनचा एक योग्य स्रोत आहे. याने मेंदू क्रियाकलाप जलद आणि विकासात सुधारणा शक्य आहे.

Trending