आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पदार्थ वाढवतील रोगप्रतिकारशक्ती आणि टीबीची शक्यता करतील कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक टीबी रुग्ण भारतामध्ये आहेत. इथे दरवर्षी जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू टीबीमुळे होतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आणि टीबीची शक्यता कमी करणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. 


कडधान्य 
भरपूर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर्स असलेल्या कडधान्याच्या सेवनाने थकवा दूर होतो. तसेच यामुळे संसर्गही होत नाही. मुलांना हे अवश्य द्या. यामुळे ऊर्जा वाढते आणि मुलांचा विकासही लवकर होतो. 
भारतामध्ये आहेत जगभरात सर्वाधिक टीबी रुग्ण 


दूध 
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि टीबीपासूनही बचाव होतो. 


गाजर : भरपूर अँटिऑक्सिडंट असलेले गाजर आहारात समाविष्ट करा. हिवाळ्यात गाजराचा रस पिणेदेखील फायद्याचे आहे. यामुळे संसर्ग होत नाही. गाजरामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यातही याची मदत होईल. 


टोमॅटो : यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि लायकोपिन असते. त्यामुळे ऊर्जा मिळते. टोमॅटोचे सूप किंवा त्याचा रस पिणेदेखील फायद्याचे ठरते. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश केला पाहिजे. यामुळे टीबीच्या संसर्गापासून बचाव करणे शक्य आहे. 


अंडी : भरपूर व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असलेल्या अंड्यांद्वारेही टीबीपासून बचाव करता येऊ शकतो. त्यासाठी दररोज उकळलेली अंडी खावीत, परंतु कच्ची अंडी खाण्याचे टाळावे. तथापि, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी अंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 


डाळी 
डाळींमध्ये जीवनसत्त्वे, खनिज आणि फायबर्स असतात. डाळींमध्ये भाज्या टाकून खाणेदेखील फायद्याचे ठरते. यात कॅलरीचे प्रमाणही कमी असल्याने वजन नियंत्रित राहते. डाळींमधील अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुण प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. 

बातम्या आणखी आहेत...