Home | Business | Industries | food-inflation-is-downing

चलनदर घटूनही महागाई वाढली

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 02:05 PM IST

गेल्या 7 मे रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात डाळी, भाज्या आणि गहू यांचे दर घटल्याने देशातील खाद्यान्न महागाई निर्देशांक 7.47 टक्क्यांवर उतरला आहे.

 • food-inflation-is-downing

  नवी दिल्ली - गेल्या 7 मे रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात डाळी, भाज्या आणि गहू यांचे दर घटल्याने देशातील खाद्यान्न महागाई निर्देशांक 7.47 टक्क्यांवर उतरला आहे. गेल्या 18 महिन्यांत खाद्यान्नाच्या दरांत झालेली ही सर्वात कमी चलनवाढ असली तरीही महागाई कायम असल्याचे चित्र आहे.

  होलसेल प्राईस इंडेक्सनुसार (डब्ल्यूपीआय) खाद्यान्नाच्या महागाईचे मापन होते. मागच्या आठवड्यात महागाईची टक्केवारी 7.70 टक्के होती, तर सन 2010 च्या याच आठवड्यात महागाई 22 टक्के होती. नुकत्याच हाती पडलेल्या आकडेवारीमुळे शासनाच्या अजेंड्यावर असलेला महागाई नियंत्रणाचा मोठा प्रश्र हलका होत असताना दिसून येत आहे.

  यावर्षी मार्चमध्ये दर उतरू लागण्यापूर्वी मागच्या पूर्ण वर्षादरम्यान खाद्यान्न महागाई दोन अंकांच्या संख्येत होती. सरकारने नुकत्याच जारी केलेल्या तिसऱया अंदाजानुसार यावर्षी गव्हाचे उत्पादन यापूर्वीचे सर्व विक्रम ओलांडणार आहे, पण इतर खाद्यान्नाच्या किमती वाढलेल्याच आहेत.
  जागतिक स्तरावर वस्तूंचे आणि विशेषत: क्रुड तेलाचे भाव कडाडल्याने आगामी महिन्यांत खाद्यान्नबाह्य वस्तूंच्या भाववाढीचा मुख्य दबाव तयार होईल, असे केंद्र शासन आणि रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. एप्रिल महिन्यात एकूण महागाईचा दर 8.66 टक्के राहिला होता. आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत एकूण महागाई 9 टक्क्यांपर्यंत वाढून दुसऱया सहा महिन्यांत ती 6 टक्क्यांवर येईल; तथापि, नजीकच्या भविष्यकाळात एकूण महागाईचे प्रमाण जास्त राहील, असे आरबीआयच्या 2011-12 वर्षासाठीच्या आर्थिक धोरणात म्हटले आहे.

  आरबीआयने मार्च 2010 पासून मुख्य व्याजदरांमध्ये नऊ वेळा वाढ केली आहे आणि मागणीवर मर्यादा घालून महागाईचा दबाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी काळात आरबीआयचे व्याजदर आणखी वाढविले जाऊ शकतात, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज व इतर कर्जे महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Trending