आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यपदार्थांची महागाई; किरकोळ महागाई दर 5.54 टक्के, ऑक्टोबर 2019 मध्ये औद्योगिक उत्पादनात 3.8% घसरण झाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.५४% वर पोहोचला आहे. हा गेल्या ३ वर्षांतील सर्वाधिक आहे. यापेक्षा जास्त ६.०७% जुलै २०१६ मध्ये होता. ऑक्टोबरमध्ये हा ४.६२% राहिला होता. म्हणजे, सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मध्यम अवधी लक्ष्या(४%)पेक्षा अधिक राहिला. रिझर्व्ह बँक पतधोरण आढाव्यात व्याजदर निश्चित करतेवेळी किरकोळ महागाई दर ध्यानात घेते. या दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी आकडे जारी केले. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दरावर जास्त परिणाम झाला. खाद्य महागाई दर नोव्हेंबरमध्ये १०.०१% राहिला. ऑक्टोबरमध्ये ७.८९% आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये(-)२.६१% होता. यापेक्षा जास्त किरकोळ महागाई दर जुलै २०१६ मध्ये ६.०७ टक्के नोंदला होता.

सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महागाई दर ४ टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यास सांगितले आहे. त्यात २ टक्क्यांची वाढही आहे. आकडेवारीनुसार कांदा, टोमॅटो आणि अन्य भाज्यांच्या दरांत वाढ झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये महागाई दरात चांगली वाढ पाहावयास मिळाली. भाज्यांची महागाई नोव्हेंबरमध्ये वाढून ३६ टक्के झाली, जी एका महिन्याआधी २६ टक्के होती. नोव्हेंबरमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात खाण्यापिण्याच्या पदार्थांचे भाव १०.०१% पर्यंत वाढले आहेत. सीपीआयमध्ये अन्नाचा वाटा ४५.९% आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर १९.६ टक्के वाढले आहेत.

ऑक्टोबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादनात ३.८% घसरण झाली

२०१८-२०१९ मध्ये आयआयपी

महिना20182019अंतर
जानेवारी132.3 134.51.7
फेब्रुवारी127.7127.5-0.1
मार्च139140.20.1
एप्रिल123126.83.4
मे128.8133.63.1
जून127.7 1302
जुलै125.8131.14.1
ऑगस्ट127.4126.6-1.1
सप्टेंबर128.6123.3 -4.3
ऑक्टोबर132.4127.7-3.8

औद्योगिक उत्पादनाचे तीन महत्त्वाचे घटक खाण, बांधकाम व वीज क्षेत्रात घसरण

ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्येही औद्यागिक उत्पादनात आकड्यात घसरण नोंदली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा आकडा ३.८ टक्के पुन्हा घसरला, म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी देशात औद्योगिक उत्पादनाचा वेग ३.८ टक्के मंद पडला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयआयपीमध्ये ८.१% वाढ झाली. ऑक्टोबरच्या आकड्यांवर लक्ष दिल्यास औद्योगिक उत्पादनाच्या तीन महत्त्वाचे घटक खाण, बांधकाम, वीज क्षेत्रात घसरण नोंदली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये खाण क्षेत्रात ऑक्टोबर २०१८ च्या तुलनेत ८ टक्क्यांची घसरण नोंदली आहे.

सप्टेंबरमध्ये आयआयपीच्या आकड्यांत ४.३% घसरण

सप्टेंबर २०१९ मध्ये आयआयपीमध्ये २०१८ च्या तुलनेत ४.३% घसरण नोंदली होती. ही घसरण गेल्या ७ वर्षांतील सर्वात मोठी घसरण होती. दुसरीकडे, सप्टेंबर २०१९ मध्ये आयआयपीची घसरण दुसऱ्या महिन्यात होती. चालू आर्थिक वर्षादरम्यान एप्रिल-सप्टेंबर २०१९ च्या आयआयपी आकड्यांचा विचार केल्यास यात केवळ १.३ टक्के वाढ नोंदली आहे. एप्रिल-सप्टेंबर २०१९ दरम्यान गेल्या एप्रिल-सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत आयआयपीमध्ये केवळ १.३ टक्के वाढ निर्देशित करते की, देशात औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग मंद आहे.
 

बातम्या आणखी आहेत...