आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील शाळेत खिचडीतून २६ विद्यार्थ्यांना विषबाधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांना मळमळ झाल्यानंतर रुग्णालयात  नेण्यात आले. - Divya Marathi
विद्यार्थ्यांना मळमळ झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले.

पुणे - कात्रज येथील धनकवडीतील राजस सोसायटी परिसरातील स्व. रामभाऊ म्हाळगी संस्थेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये वाटप होत असलेली पोषण आहारातील खिचडी खाऊन इयत्ता आठवी, नववी व दहावीमधील २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उलट्या झालेल्या चार विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

रामभाऊ म्हाळगी विद्यालयात बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी संपदा किरकोळे या शिक्षिकेने नियमाप्रमाणे खिचडी खाऊन अर्ध्या तासाने विद्यार्थ्यांना खिचडी वाटप केली. पंधरा मिनिटांनी काही विद्यार्थ्यांना मळमळ झाली. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागल्याने शाळा प्रशासनाने २६ विद्यार्थ्यांना तत्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यातील एक विद्यार्थी अतिदक्षता विभागात, तर तीन  विद्यार्थ्यांना सलाइनवर ठेवण्यात आले आहे. २२ विद्यार्थी जनरल विभागात उपचार घेत आहेत. या शाळेत शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना दररोज खिचडी दिली जाते. या प्रकाराची शाळा प्रशासनाने चौकशी सुरू असल्याचे सांगितले.