आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगरोळीच्या ५० विद्यार्थ्यांना खिचडीतून झाली विषबाधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - बिलोली  तालुक्यातील सगरोळी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील तब्बल पन्नास विद्यार्थ्यांना दुपारच्या खिचडीतून विषबाधा झाल्यामुळे बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.
छत्रपती शिवाजी विद्यालयातील वर्ग ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भाेजनात खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यामुळे काही विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर, मळमळ होऊ लागली. याची माहिती मिळताच पालकांनी विद्यालयाकडै धाव घेऊन शिक्षकांच्या मदतीने तातडीने बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात विषबांधा झालेल्या विद्यार्थ्यांना हलवले.


विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने लागलीच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावार डॉ. समरनीण, औषध निर्माण अधिकारी सोहेल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मुलांवर तत्काळ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.  या वेळी रुग्णालयात जाऊन तहसीलदार विक्रम राजपूत, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. मात्र, नेमकी विषबाध कशामुळे झाले याचा तपास करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.