आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Food Stuck In Nick Jonas's Teeth Seen During Performances, People Make His Fun On Social Media

परफॉर्मन्सदरम्यान दिसले निक जोनासच्या दातांमध्ये अडकलेले अन्न, सोशल मीडियावर उडवली जात आहे खिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरामध्ये 62 व्या ग्रॅमी अवॉर्डदरम्यान प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने आपल्या भावांसोबत स्टेज परफॉर्मन्स दिला. रविवारी रात्री झालेल्या या इव्हेंटमध्ये त्याने आपले नवीन गाणे '5 मोअर मिनट्स' सोबत 'व्हाट अ मॅन गोटा डू' यांसारखे गाणेही गायले. मात्र निकला तेव्हा लाजिरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला जेव्हा फॅन्सने त्याच्या दातांमध्ये अडकलेली एक गोष्ट नोटिस केली. त्याच्या दातांमध्ये अन्न अडकलेले होते. जे कॅमेऱ्यात दिसले. त्यानंतर लोक त्याला ट्रोल करू लागले. 

निकचा व्हिडिओ शेअर करत अनेक सोशल मीडिया यूजर्सने सांगितले की, त्याच्या दातांमध्ये उजव्या बाजूला काहीतरी अडकलेले आहे. नंतर एक मजेशीर मजेदार पोस्ट करत स्वतः निकने आपली चूक मान्य केली. लिहिले, 'कमीत कमी आता तरी सर्वांना माहित झाले की, मीसुद्धा हिरव्या पालेभाज्या खातो.' या इव्हेंटमध्ये जोनास ब्रदर्सला त्यांचे गाणे 'सकर' सरही बेस्ट पॉप डुओ/ग्रुप परफॉर्मन्स कॅटॅगरीमध्ये नॉमिनेट केले गेले होते. इव्हेंटमध्ये प्रियांका राल्फ आणि रूसोचा प्लंगिंग ड्रेस घालून पोहोचली होती. 

सोशल मीडियावर यूजर्सने केले ट्रोल... 

निक जोनासचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...