आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायांचे पंजे सांगतील तुम्ही किती निरोगी आहात, आजारावर राहील नियंत्रण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तज्ञांच्या मते पायांच्या पंज्यांची अवस्था आपल्या आरोग्याची माहिती देऊ शकतात. येथे जाणून घ्या, या गंभीर आजाराच्या सुरुवातीलाच काळजी कशी घ्यावी...


पंजे थंड पडणे
हा हायपो-थायरॉइडिझमचा संकेत असू शकतो. हे थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे हाेते. तसे पाहिले तर रेनॉउड्जच्या आजारात हाता-पायांच्या बोटांचे तापमान, तणाव, धूम्रपान आणि औषधांबाबत खूप संवेदनशील होऊन जातात.
काय करावे- थकवा, अंग दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. रेनॉउड्स असेल तर गरम आणि थंड तापमानापासून बचाव करा. 


नखांच्या आकारात बदल 
नखांच्या आकारात बदल रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतो. परंतु ही लक्षणे फुप्फुस, हृदय किंवा पोटाशी संबंधित समस्यांचीही असू शकतात. जर रंगात बदल झाला तर  हा एक प्रकारचा त्वचा रोग सोरायसिस असू शकतो. 
काय करावे- हृदयाशी संबंधित अाजार असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


पुरळ किंवा आखडणे
असे मधुमेहामुळे होऊ शकते. पंज्यात आखडणे, आसपास संवेदना कमी होणे आणि लाल रंगाचे पुरळ ठीक न होणे. टाइप-२ मधुमेहाची ही लक्षणे आहेत.
काय करावे- सारखी सारखी तहान लागणे, थकवा आणि वजन कमी होत असेल तर डॉक्टरांना दाखवा.

बातम्या आणखी आहेत...