आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी 140 किमीच्या वेगाने जात होती रेल्वे, तेवढ्यात पटरीहून उतरली आणि खंब्याला धडकत प्लेटफॉर्मवर चढली, 18 ठार 187 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेशनल डेस्क/बीजिंग - तैवानच्या यिलान कौंटीमध्ये रविवारी सायंकाळी ताशी 140 किलोमीटर वेगाने जाणारी एक हायस्पीड रेल्वे रुळावरून उतरल्याने झालेल्या अपघातात 18 जण ठार झाले तर 187 जखमी झाले. रेल्वे अपघातातील मृतांच्या आकड्याचा विचार करता चीनमधील ही 27 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना आहे. तैवानच्या राष्ट्रपतींनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4:50 वाजता झाला. त्यावेळी रेल्वेत 366 लोक प्रवास करत होते. रेल्वेचे सर्व आठ डब्बे रुळावरून घसरले तर तीन डब्बे पलटी झाली. 


ही हाय स्पीड पुयुमा एक्सप्रेस 6432 तैपेई आणि पूर्वी किनारपट्टीवरील कौंटी तायतुंग दरम्यान चालत होती. परिवहन मंत्रालयानुसार, मृतांमध्ये 9 वर्षांच्या सर्वात लहान मुलाचा समावेशही आहे. काही प्रवासी बेपत्ता आहेत. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने क्रेन पाठवत ट्रॅक क्लिअर केला असून काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे. सोमवारी सकाळी तैपेईच्या राष्ट्रपतींनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. यात एक अमेरिकन नागरिक जखमी झाला आहे. तर इतर सर्व प्रवासी तैवानचे आहेत. रेल्वे पटरीवरून उतरल्याच्या कारणांबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. तर प्राथमिक तपासात अपघाताचे कारण रेल्वेचा वेग असल्याचे सांगण्यात आले आहे. 


1991 मध्ये मारले गेले होते 30 प्रवासी 
1991 नंतरची तैवानची ही दुसरी सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना आहे. 1991 मध्ये पश्चिम तैवानच्या मियाओलीमध्ये दोन रेल्वे समोरा समोर धडकल्याने 30 प्रवासी ठार झाले होते, तर 112 जखमी झाले होते. 


 

बातम्या आणखी आहेत...