आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षक समलिंगीविरोधी फलक घेऊन पोहोचले; बॅनर जाळले 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाँगव्हिले : मैदानावरील खेळाडूंच्या वर्तनाबरोबर स्टेडियममधील प्रेक्षकांचे वर्तनदेखील खेळासाठी महत्त्वाचे आहे. याचाच भाग म्हणून फ्रेंच लीगने प्रेक्षकांच्या वर्तनावर झीरो टॉलरन्स पॉलिसी तयार केली. शुक्रवारी रात्री पीएसजीविरुद्ध मेट्स सामना दहा दिवसांत दुसऱ्यांदा प्रेक्षकांच्या गैरवर्तनामुळे थांबवण्यात आला. यापूर्वी नॅन्सी आणि ली मेन्स यांच्यातील सामनादेखील रोखण्यात आला होता. तो सामना पुन्हा सुरूच करता आला नाही. पीएसजी व मेट्स सामना जवळपास १५ मिनिटांनी पुन्हा सुरू केला. पीएसजीने २-० ने विजय मिळवला. सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी समलिंगीविरुद्ध बॅनर फडकावले, नारे दिले. त्यामुळे सामना थांबवला.त्यानंतर चाहते आणखी नाराज झाले. त्यांनी स्टँडमध्येच बॅनर जाळले.  नेमार बार्सिलोनात जाण्याची चर्चा  पीएसजीचा एमबापे व कवानी दुखापतीमुळे खेळले नाही. स्टार नेमारदेखील मैदानात उतरला नाही. नेमारच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या बार्सिलोनामध्ये जाण्याच्या चर्चोला उधाण आले. नेमार २०१७ ला पीएसजीशी जोडला.