आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Football: Two Years Later Manchester City Club Have A Chance To Win 2 Consecutive Matches Against Crystal

फुटबॉल : दोन वर्षांनी मँचेस्टर सिटी क्लबला क्रिस्टलविरुद्ध सलग 2 सामने जिंकण्याची संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीगच्या (ईपीएल) एका सामन्यात शनिवारी मँचेस्टर सिटीचा सामना क्रिस्टल पॅलेसशी होईल. सध्याचा चॅम्पियन सिटीची टीम सध्याच्या सत्रात चांगली सुरुवात करू शकली नाही. संघाने आतापर्यंत खेळवलेल्या ८ पैकी ५ सामन्यांत विजय मिळवला. दोनमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. संघ १६ गुणांसह तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, नंबर वन स्थानासाठी ते लिव्हरपूलपेक्षा ८ गुणांनी मागे आहे. लिव्हरपूलने सध्याच्या सत्रात आपले सर्व ८ सामने जिंकले. सिटीने आजच्या सामन्यात क्रिस्टलला पराभूत केल्यास ते दोन वर्षांनी त्यांच्याविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवेल. टीमने अखेरच्या वेळी २०१७ मध्ये क्रिस्टलला दोन सामन्यांत हरवले होते.

सिटी व क्रिस्टल यांच्यात सर्व स्पर्धेचा विचार केल्यास आतापर्यंत ६१ सामने झाले. सिटीने ३२ आणि क्रिस्टलने १६ लढती जिंकल्या. १३ सामने बरोबरीत राहिले. प्रीमियर लीगच्या गेल्या सत्रात झालेल्या २ सामन्यांपैकी त्यांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला. दोघांत झालेल्या अखेरच्या दहा लढतींमध्ये सिटीने ८ व क्रिस्टलने १ सामना जिंकला.


सिटीकडून एगुएरोने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक आठ गोल केले आहेत
सिटीचे आतापर्यंत सर्वाधिक
गोल
प्रीमियर लीगच्या चालू सत्रात सिटीने सर्वाधिक २७ गोल केले. मात्र अखेरच्या सामन्यात त्यांना वोल्व्सविरुद्ध ०-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. टीम हा पराभवातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. नॉर्विच सिटीविरुद्ध सिटीला हार पत्करावी लागली. दुसरीकडे क्रिस्टल पॅलेसने ८ पैकी ४ सामने जिंकले, तर दोन सामन्यांत पराभव झाला. संघ १४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. टीम आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.

आज होणारे सामने...
एवर्टन v/s वेस्ट होम सायं. ५ वा.
एस्टन विला v/s ब्रिग्टन सायं. ७.३० वा.
टॉटेनहम v/s वाटफोर्ट सायं. ७.३० वा.
वोल्व्स v/s साऊथम्प्टन सायं. ७.३० वा.
चेल्सी v/s न्यूकॉसल सायं. ७.३० वा.
मँचेस्टर सिटी v/s क्रिस्टल पॅलेस रात्री १० वा.

ला लीगा : सध्याचा चॅम्पियन बार्सिलोनाचा सामना एबरशी... 
माद्रिद : स्पॅनिश ला लीगामध्ये सध्याचा चॅम्पियन बार्सिलोनाचा सामना एबरशी होईल. बार्सिलोनाने चालू सत्रात ८ पैकी ५ सामने जिंकले, त्याना दोनमध्ये हार पत्करावी लागली. संघ १६ गुणांसह तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. रिअल माद्रिद १८ गुणांसह अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे एबरने आतापर्यंत ८ पैकी केवळ दोनच लढती जिंकल्या. तीन लढतीत त्याचा पराभव झाला. टीम ९ गुणांसह तालिकेत १४ व्या स्थानी पोहोचली. रिअल माद्रिदचा सामना मालोरकाशी होईल. माद्रिदने सर्वाधिक ३३ वेळा ला लीगाचा किताब जिंकला.

बार्सिलोना- रियलच्या सामन्याची तारिख वाढवली... 
बार्सिलोना व रियल माद्रिद यांच्यात २६ ऑक्टोबर रोजी सामना होणार होता. मात्र कॅटेलोनिया वादामुळे सध्या नागिरक प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे सामन्याच्या तारीख वाढवण्यात आली.