Home | Sports | Other Sports | footballer maradona criticise

ग्रोनडोनावर पुन्हा साधले मार्डोनाने शरसंधान

Agency | Update - May 29, 2011, 01:48 AM IST

गत महिनाभरापासून अर्जेंटिना फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ग्रोनडोनांवरच्या मादक पदार्थ सेवनास होकार दिल्याप्रकरणावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे.प्रसिद्ध खेळाडू मार्डोना याने पुन्हा एकदा या वादाला उजाळा दिला आहे.

  • footballer maradona criticise

    आयर्स - गत महिनाभरापासून अर्जेंटिना फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ग्रोनडोनांवरच्या मादक पदार्थ सेवनास होकार दिल्याप्रकरणावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे.प्रसिद्ध खेळाडू मार्डोना याने पुन्हा एकदा या वादाला उजाळा दिला आहे.

    मागील महिनाभरापासून अर्जेंटिना संघास मादक पदार्थ सेवनाची मुभा अध्यक्ष ग्रोनडोना यांनीच दिल्याचा आरोप मार्डोना करत आहे.हाच कित्ता त्याने पुन्हा एकदा गिरवून याप्रकरणी दोषी असलेल्या अध्यक्ष ग्रोनडोनावर कारवाई व्हावी,अशी मागणीही त्याने केली आहे.1994मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेंटिना संघातील खेळाडूंना अध्यक्ष ग्रोनडोना यांनी मादक पदार्थ सेवनाची मुभा दिली असल्याचा आरोप अर्जेंटिना संघाचा आघाडीचा खेळाडू मार्डोना याने केला आहे.

Trending