आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केशरचनेत बदल करा, केस सुंदर होतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर केसांसाठी कंडिशनरचा वापर नेहमी करायला हवा. यामुळे खराब वातावरणातही केसांचे सौंदर्य आणि चमक टिकून राहील. केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि केस अधिकाधिक आकर्षक दिसण्यासाठी काही ‘इझी टू डू’ केशरचना तुम्ही करून पाहू शकता. यामध्ये वेव्ह पॅटर्नची केशरचना सर्वोत्तम आहे. उष्णता आणि ओलाव्यामुळे केसांमध्ये वेव्हज दिसतात. यामुळे मेसी लूक मिळेल. हा लूक मिळवणे तसे कठीण नाही. टॉवेलवर मूस लावा आणि केसांना चोळा. त्यानंतर ओल्या केसांची सात ते आठ बटांमध्ये विभागणी करा. ओल्या केसांना पीळ द्या, म्हणजे हा लूक तुम्हाला सहजगत्या मिळू शकले.

केस वाळल्यावर पीळ सोडा. रुंद दाते असलेल्या कंगव्याने केस विंचरून घ्या आणि केस स्टायलिंग स्पे्र मारून सेट करा. वेळ कमी असेल तर फास्ट पोनी बांधा. केस ओले करून हेअर जेल लावा. त्यानंतर केसांची घट्ट पोनी घाला. मेसी लूकसाठी तुम्ही बॅक कोम्बही करू शकता. फिनिशिंग टचसाठी हेअर स्पे्र वापरा. मध्यम आणि लांब केसांसाठी ही केशरचना उत्तम दिसेल.

पार्टीमध्ये जायचे असेल, तर तुम्हाला पिन अप बनमुळे रिलॅक्स लूक मिळेल. या लूकसाठी खाली पोनीटेल बांधून त्यावर बन बांधून घ्या. दोन्हीकडून काही बटा चेह-या वर येऊ द्या. बन सेट करण्यासाठी तुम्ही बन पिन्सचा वापर करा. नीट लूक मिळवण्यासाठी ओल्या केसांवर जेल वापरू शकता. मध्यम लांबीच्या केसांना ही स्टाइल छान दिसेल.
प्रिव्हेन्शन नियतकालिकातून