आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटासाठी डॉक्टरने दिले पत्नीला एचआयव्हीचे इंजेक्शन; पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- घटस्फोट मिळवण्यासाठी पत्नीच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडणाऱ्या डॉक्टर पतीचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी बुधवारी फेटाळला. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात हा प्रकार घडला होता. 

 

पिंपळे सौदागर भागातील २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पडवळनगर येथे राहणारा डॉक्टर पती, सासरा व सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा डॉक्टरशी मे २०१५ मध्ये विवाह झाला. त्यानंतर सासरच्या मंडळीनी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. दरम्यान, त्यांनी काही रक्कम घेतली होती. मात्र त्यांची मागणी वाढत गेल्याने महिलेने नकार दिला. यामुळे तिला मारहाणही करण्यात आली. पैसे मिळत नसल्याने तिचा घटस्फोटासाठी छळ करण्यात आला. महिला आजारी असताना तिच्या पतीने घरीच तिला सलाइन दिले होते. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. काही दिवसांनी तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पतीने अर्ज केला होता. मात्र, पुढील तपासासाठी चौकशी करणे गरजेची असल्याने जामीन फेटाळावा, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. दरम्यान, युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पतीचा जामीन फेटाळला. 

 

बातम्या आणखी आहेत...