आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सरकारबाबत आज दिल्लीत हाेणार खलबते, फडणवीसांची शहांशी, शरद पवारांची साेनियांशी चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस उलटले तरी स्पष्ट बहुमत असलेल्या भाजप- शिवसेनेत सत्तास्थापनेबाबत एकमत हाेताना दिसत नाही. त्यातच आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात असल्याने भाजपच्या काळजीत भर पडली आहे. आता राज्यात हा तिढा सुटत नसल्यामुळे साेमवारी दिल्लीत याबाबत खलबते हाेऊन अंतिम निर्णय हाेण्याची शक्यता आहे.


पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साेमवारी दिल्लीत जात आहेत. भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेणार आहेत. या भेटीत ते मदतीबराेबरच युतीतील तिढा कसा साेडवायचा याबाबतही अमित शहांकडून मार्गदर्शन घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री करावा, असे डावपेचही आखले जात आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साेमवारी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधींशी दिल्लीत याबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

आमच्याकडे १७० वर आमदार : संजय राऊत
१७० हून अधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच हाेईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. अमित शहांनी मध्यस्थी करुन तिढा साेडवावा, अशी मागणीही त्यांनी केली. सविस्तर. पान ४
 

बातम्या आणखी आहेत...