Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | astrological tips for happy life

वाईट काळातून मुक्तीसाठी सकाळी स्नानाच्या पाण्यामध्ये टाकून पाहा या गोष्टी

रिलिजन डेस्क, | Update - Jul 05, 2019, 12:15 AM IST

दुर्भाग्य दूर करण्यासाठी स्नानाच्या पाण्यामध्ये टाकू शकता या शुभ गोष्टी, वाईट काळातून मिळेल मुक्ती

 • astrological tips for happy life

  ज्योतिषमध्ये सर्व महत्त्वाच्या कामासाठी उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते. दिवसभरातील महत्तवाच्या कामापैकी एक आहे स्नान करणे. पूजा-पाठ करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. स्नान करताना पाण्यामध्ये चंदन आणि हळद यासारख्या शुभ गोष्टी टाकल्यास पुण्य प्राप्त होते. वाईट काळातून मुक्ती मिळते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, अशा 5 गोष्टींविषयी ज्या स्नानाच्या पाण्यात टाकल्यास शुभफळ प्राप्त होतात...


  # पहिली गोष्ट आहे चंदन
  रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये पाण्यात चिमुटभर चंदन टाकून ठेवावे. सकाळी स्नानाच्या पाण्यामध्ये हे चंदनाचे पाणी मिसळून स्नान करावे. यामुळे पावित्र्य वाढते आणि त्वचेसाठी हे पाणी लाभदायक ठरते.


  # दुसरी गोष्ट आहे हळद
  पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून स्नान करावे. असे केल्याने गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होऊ शकतात. या पाण्याच्या शुभ प्रभावाने त्वचेलाही लाभ होतो.


  # तिसरी गोष्ट आहे कापूर
  एका बादलीभर पाण्यात कापूरच्या 2-3 वड्या टाकाव्यात. या पाण्याने स्नान करणे शुभ मानले जाते. कापूरच्या गंधाने आपल्या जवळपासची नकारात्मकता नष्ट होते.


  # चौथी गोष्ट आहे गंगाजल
  पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान केल्यास घरातच गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळू शकते. स्नान करताना गंगा नदीचे स्मरण करावे.


  # पाचवी गोष्ट आहे मीठ
  मिठामध्ये नकारात्मकता ग्रहण करण्याची शक्ती असते. स्नानाच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकल्याने तुमच्या जवळपासची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते.

Trending